“मादक अदांनी घायाळ करणारी हि मराठी अभिनेत्री पाहून वेडे व्हाल!”

सुरवातीला तमिळ चित्रपटांतुन पल्या करिअरची सुरुवात केलेल्या श्रुतीचे दाक्षिणात्य प्रेक्षकांनी खूप कौतुक केले. मनोरंजन विश्वात पदार्पण करताना श्रुतीने आपलं नाव प्रथम हेमामालिनी व नंतर श्रुती प्रकाश असं केले. तामिळ चित्रपटात श्रुती प्रकाश या नावानेच तिची ओळख आजही आहे. मराठीत श्रुतीने सनई चौघडे या चित्रपटापासून सुरुवात केली.

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका राधा ही बावरी या मधून तिला मराठी रसिकांची दाद मिळाली. पुढे जाऊन मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री श्रुती मराठे अशी वेगळी ओळख सोशल मीडियावर तयार करणाऱ्या, चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडली. “करिअरमध्ये चढ-उतार येतातच, मात्र हा प्रवास छान आहे. कलाकारानं कायम विनम्र असावं.

सध्या ओटीटी हे माध्यम सर्वाधिक चर्चेत आहे. जे इंडस्ट्रीतले कलाकार नाहीत त्यांच्यासाठी ओटीटी हे उत्तम व्यासपीठ आहे. कारण तिथे स्टार नाही, तर अभिनेते कास्ट होतात” हे म्हणणं आहे मराठी अभिनेत्री श्रुती मराठे हिचं! आघाडीच्या मराठी अभिनेत्रींपैकी सर्वांची लाडकी राधा अर्थात अभिनेत्री श्रुती मराठे ही चित्रपट आणि सिरिअल विश्वासोबतच सोशल मीडियावर देखील कमालीची सक्रिय आहे.

इंस्टाग्राम वरील नवनवीन फोटोशूटमध्ये श्रुतीचा ग्लॅमरस अंदाज पाहून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकत असतो. अलग हूं.. गलत नही.. पुण्याची मैना.. धडकन.. अशा शीर्षकाचे फेमस फोटोशूटमधील तिचा बोल्ड अंदाज पाहून चाहत्यांनीही कमेंट बॉक्समध्ये श्रुतीला नेहमीच भरभरून दाद दिली आहे. अभिनय आणि सौंदर्य आणि गालांवरील डिम्पल्स यांची सुंदर जुगलबंदी असलेली ही मराठमोळी अभिनेत्रीने प्रचंड गाजलेला शिवकालीन “सरसेनापती हंबीरराव या चित्रपटात काम केलयं.

‘सरसेनापती हंबीरराव’ मध्ये ऐतिहासिक हंबीरराव यांच्या भूमिकेत प्रत्यक्ष प्रविण तरडे होते चित्रपटाची निर्मिती शेखर रघुनाथराव मोहिते पाटील, सूर्यकांत निकम व धमेंद्र बोरा यांची तर छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत गश्मीर महाजनी आहे. शुभंकर एकबोटे, अभिनेते उपेंद्र लिमये, राकेश बापट, रमेश परदेशी, सुनील अभ्यंकर, देवेंद्र गायकवाड कलाकारांची तगडी फळी पहायला मिळाली आणि अप्रतिम कलाकृती सादर झाली.

या ऐतिहासिक चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज संभाजी महाराज यांच्या कालखंडात स्वराज्याचे सरसेनापती म्हणून अतुलनीय शौर्य गाजविलेले सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाचा धगधगता इतिहास पहायला मिळाला. मालिका विश्वातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी आणि आपल्या अनोख्या अंदासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री श्रुतिने या चित्रपटात सोयराबाईंची भूमिका साकारलेली. श्रुतीला भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा!

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *