“आमीर खानची कन्या आयराने बाॅयफ्रेंडसह असा जल्लोषात बर्थडे केला साजरा!”

आमिर खानची मुलगी आयरा खान आजकाल सतत चर्चेत असते. सध्या आपल्या पर्सनल लाईफमुळे आयरा खान भलतीच चर्चेत आहे. महिन्याभरापुर्वीच आयरानं आणि तिच्या बॉयफ्रेंडनं एक व्हिडीओ शेअर केला होता ज्याची चर्चा संपुर्ण देशात पसरली होती. या व्हिडीओत नुपूर शिखरेनं आयराला प्रपोझ करत तिच्याशी साखरपुडा केला. त्यामुळे त्या दोघांची एकच चर्चा सुरू झाली आहे.

मध्यंतरी नुपूर शिखरे इतका चर्चत आला होता. रणवीरप्रमाणे त्याचंही न्यूड फोटोशूट पुन्हा एकदा चर्चत आलं होतं. आता आयराचा बॉयफ्रेंड पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी मात्र कारणही तसंच खास आहे. आपल्या बॉयफ्रेंडसाठी आमिरच्या लेकीनं महागडा केक आणून त्याचा वाढदिवस साजरा केला आहे. १८ ऑक्टोबरला आयरानं आपल्या इन्टाग्राम स्टोरीवर नुपूरच्या बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत.

आयरा आणि नुपूर कायमच एकमेकांसोबत असतात. कुठलीही पार्टी असो वा मित्र-मैत्रीणींसोबत ते कायमच स्पॉट होतात. आताही तसंच झालं आहे.
आपल्या नुपूरचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आयरानं खास सेलिब्रेशनचं आयोजन केले होतं. आयरा खान बॉलिवूडच्या स्टार किड्सपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे जिला फारसा फिल्मी दुनियेत रस नाही. आमिर खान सुपरस्टार असूनही इरा स्वतःला इंडस्ट्रीपासून दूर ठेवते परंतु असे असले तरी सध्या ती तिच्या लव्ह लाईफमुळे प्रचंड चर्चेत आहे.

नुपूरच्या वाढदिवशी इरा खानने तिच्या इंस्टाग्रामवर नुपूरच्या बर्थडेचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून त्यांच्या चाहत्यांनाही आनंद झाला आहे. या व्हिडीओमध्ये नुपूर केक कापताना दिसतो आहे. हा महागडा केक खाण्यासाठी नुपूरच्या तोंडाला पाणी सुटलं आहे. दुसऱ्या एका फोटोमध्ये नुपूरच्या तोंडाला केक लागलेला दिसतो आहे आणि यावर आयरालाही तिचं हसू आवरता आलेलं नाही. ह्या जोडीला भविष्यासाठी शुभेच्छा!

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *