“श्रीलंकन गोलंदाज केशव महाराजची पत्नी दिसते अभिनेत्रीपेक्षाही सुंदर!”

केशवची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द खुपचं गाजलीय. केशव महाराज दक्षिण आफ्रिकेसाठी ४५ कसोटी सामने खेळला आहे. यात त्याने १५४ विकेट गेतले आहेत. कसोटी सामन्यात त्याने ०९ वेळा ०५ विकेट घेतल्या आहेत, तर एकदा त्याने १० विकेट घेण्याची किमया साधली आहे. याशिवाय २६ एकदिवसीय सामन्यात २८ विकेट त्याच्या खात्यात जमा आहेत. २१ टी-२० सामन्यात त्याने आतापर्यंत जवळपास २० विकेट घेतल्या आहेत.

नुकत्याचं झालेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान झालेल्या एकदिवसीय मालिकेत भारताने २-१ असा विजय मिळवला. भारताच्या युवा खेळाडूंनी दमदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेच्या अनुभीव संघाला धूळ चारली. पण या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा स्पीन बॉलर केशव महाराज मात्र चांगलाच चर्चेत राहिला. आपल्या दमदार कामगिरीने केशवने मालिकेवर छाप उमटवली.

दक्षिण आफ्रिकेच्या या स्टार खेळाडूने नुकतंच आपल्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. केशव महाराजने भारतीय मुलीशी लग्न केलं आहे. केशवच्या पत्नीचं नाव लेरिशा असं आहे. या दोघांच्या लग्नाची गोष्ट खूपच मजेशीर आहे. अनेक वर्ष या दोघांनी एकमेकांना डेट केलं, त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

केशव आणि लेरिशासमोर सर्वात मोठा प्रश्न होता तो कुटुंबातील सदस्य या लग्नाला तयार होतील का ह्या गोष्टीचा….कुटुंबाला समजवण्यासाठी केशव महाराजने आपल्या आईच्या ५० व्या वाढदिवसाचा मुहूर्त निवडला. आईच्या वाढदिवशी केशव आणि लेरिशाने एक सुंदर नृत्य केलं. दोघांनी भारतीय पारंपारिक पोशाख परिधान केला होता. दोघांमधलं बॉण्डिंग पहाता केशवच्या आईने त्यांना लग्नाची परवानगी दिली.

भारतीय संस्कृतीशी जोडलेली असल्यामुळे केशवच्या आईला लेरिशा जास्तच पसंत पडली. भारतीय मूळ निवासी असलेली लेरिशा कथकमुळे दक्षिण आफ्रिकेत खूप प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर कथक पेहरावातले अनेक फोटो आणि व्हिडिओ ती शेअर करत असते. लग्नासाठी लेरिशाने केशवसमोर कथक शिकण्याची अट ठेवली होती. लेरिशाबरोबरच लग्न करण्याचा निर्धार केलेल्या केशवने तिची ही अट मान्य केली आणि कथक शिकला. २२’एप्रिल २०२२ ला केशव आणि लेरिशाने लग्न केलं.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *