नेहमीच्या केशकर्तनामुळे तारक मेहता मधील जेठारामचे बापुजींना झाला आजार!

दुरदर्शनवर गेल्या १४ वर्षांपासून प्रेक्षकांना आपल्या हलक्याफुलक्या आणि संपुर्ण फॅमिलीला सोबत बसुन बघता येणार्या “तारक मेहता का ऊलटा चष्मा” मालिकेने प्रचंड मनोरंजन करत खिळवुन ठेवले आहेचं! मधल्या काळात मालिकेतील बरेचसे कलाकार बदलण्यात आले तर काहींनी एक्झिट घेतली मात्र तरीही ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली.

मालिकेत बापूजी म्हणजेच चंपकलाल हे कॅरेक्टर देखील प्रभावी ठरलेले पाहायला मिळाले. मात्र ही भूमिका साकारत असताना या अभिनेत्याला प्रत्येक शूटिंगच्या अगोदर टक्कल करावे लागले होते. चंपकलालची भूमिका अभिनेते “अमित भट्ट” यांनी साकारली. अमित भट्ट हे नाट्य अभिनेते म्हणून परिचित आहेत. नाटकात काम करत असताना त्यांना तारक मेहता का उलटा चश्मा मालिकेत अभिनयाची संधी मिळाली.

आपल्या वयापेक्षा मोठ्या वयाची भूमिका साकारणे कठीण असले तरी भूमिकेला साजेसा गेटअप आणि सजग अभिनयातून त्यांनी साकारलेला चंपकलालची भुमिका अधिकच खुलत गेली. या भूमिकेसाठी अमित भट्ट यांना शूटिंगच्या दरम्यान टक्कल करावे लागत असे. दोन दिवसांतच डोक्यावरचे केस वाढू लागल्याने त्यांना मालिकेत काम करताना पुन्हा पुन्हा टक्कल करावे लागे.

मागील दशकाहून अधिक काळ सुरु असलेल्या मालिकेतील भूमिकेसाठी सततच्या केस कापण्याने त्यांच्या त्वचेला इजा होऊ लागली. याचा त्रास प्रत्यक्ष शूटिंग दरम्यान जास्त जाणवत होता. या त्रासाला कंटाळून त्यांनी डॉक्टरकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्वचेचा गंभीर आजार होऊ शकण्याची बात विविध चाचण्याद्वारे पुढे आली. यापुढे टक्कल न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्यावर त्यांच्या भूमिकेबाबत मालिकेच्या टीमने देखील एक महत्वाचा निर्णय घेतला.

टक्कल न करता चंपकलाल टोपी घालून प्रेक्षकांसमोर येऊ लागले. मालिकेत हा केलेला बदल प्रेक्षकांच्याही लक्षात आला मात्र मालिकेवरील प्रेमाखातर त्यांनी हा बदल स्वीकारला. आजवर प्रेक्षकांच्या प्रेमाखातर ही मालिका इतकी वर्षे टीव्ही क्षेत्रात अधिराज्य गाजवताना दिसत आहे. आबालवृद्धांमध्ये लोकप्रियता मिळवलेली ही मालिका टीआरपीच्या बाबतीतही कायम अव्वलच ठरलेली आहे. पुढील भविष्यासाठी शुभेच्छा!

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *