हा बालकलाकार आता आहे प्रसिद्ध अभिनेता ज्याने “आई पाहिजे” मध्ये केले होते काम!

१९८८ साली कमलाकर तोरणे दिग्दर्शित “आई पाहिजे” हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आशा काळे, रमेश भाटकर, प्रशांत दामले, लक्ष्मीकांत बेर्डे, नयनतारा, श्रीलेखा, आराधना देशपांडे, सदाशिव अमरापूरकर अशी भली मोठी स्टार कास्ट या चित्रपटाला लाभली होती तर ‘आली दिवाळी…आली दिवाळी… ‘हे लोकप्रिय गाणंही याच चित्रपटातलं.

अभिनेत्री आशा काळे यांनी या चित्रपटात आईची प्रमुख भूमिका बजावली होती तर रमेश भाटकर यांनी त्यांच्या मुलाची भूमिका साकारली होती. लहानपणापासूनच आपल्या मुलाच्या चुकांवर दुर्लक्ष केल्यास त्याचा काय परिणाम होतो असे हे चित्रपटाचे कथानक यशवंत रांजनकर यांनी आपल्या लेखणीतून सुरेख दर्शविलेले पाहायला मिळाले.

या चित्रपटात रमेश भाटकर यांच्या बालपणीची भूमिका साकारणारा हा चिमुरडा आज एक प्रसिद्ध चेहरा म्हणून परिचयाचा बनला आहे त्याबाबत अधिक जाणून घेऊयात… या बालकलाकाराचे नाव आहे “शेखर फडके.” आई पाहिजे चित्रपटात पहिल्यांदा शेखरला खलनायक साकारण्याची संधी मिळाली आणि अशाच भूमिकांची गोडी त्याच्यात निर्माण होत गेली.

पाचवीत असताना त्याने रायगडाला जेव्हा जाग येते नाटकात बालपणीचे राजाराम साकारले होते. मग इथूनच अभिनयाला खरी सुरुवात झाली भांडुपच्या विद्यामंदिर शाळेत शिकत असताना शाळेचे मुख्याध्यापक विश्वासराव धुमाळ हे लेखक दिग्दर्शक होते. त्यांच्या प्रोत्साहनाने कुमार कला केंद्रात बक्षीस मिळाले. सातवीत असताना आई पाहिजे चित्रपटात अभिनेते रमेश भाटकर यांच्या बालपणीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली.

ही भूमिका छोटीशी जरी असली तरी खलनायक साकारायची आवड इथूनच त्याच्यात निर्माण झाली. त्यानंतर खलनायकी ढंगाच्या भूमिकेनी त्याची पाठ सोडली नाही विठू माऊली मालिका असो वा सरस्वती मालिका यातून त्याने साकारलेला खलनायक काहीशा विनोदी वलयाचा दिसला. सरस्वती मधला भिकुमामा तर त्याने अतिशय सुरेख रंगवलेला पहायला मिळाला होता. एकदा तर विठू माऊलीच्या सेटवर असताना ‘पुंडलिकाला का त्रास देतोस’ म्हणून एका आजीने शेखरला काठीने चांगलाच चोप दिला होता.

त्याच्या विरोधी अभिनयातून प्रेक्षकांना राग येणे हीच तर त्या कलाकारासाठी एक मोठी पावती ठरत असते. शेखरच्या बाबतीतही तेच घडले असे म्हणायला हरकत नाही. खलनायकासोबतच त्याने अनेकदा विनोदी भूमिका देखील रंगवल्या आहेत. त्याचे हे दोन्ही पैलू उत्कृष्ट अभिनयाची जाण करून देतात. तसेच स्टार प्रवाहवरील फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतून तो किरणच्या भूमिकेत झळकलेला. पाककला स्पर्धेचा परीक्षकाचे काम त्याने केले होते.हे. शेखरला भविष्यासाठी शुभेच्छा!

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *