NMJOKE

“सौंदर्याच्या बाबतीत करीनाच्या तैमुरलाही मागे टाकते राणी मूखर्जीची मूलगी…पहा!”

वर्ष१९९६मध्ये “राजा की आएगी बारात” या चित्रपटातून राणी मुखर्जीने बॉलीवुड मध्ये पदार्पण केले. ह्यानंतर तिने एकापेक्षा एक सुपरङुपरहिट चित्रपट केले आहेत. त्यानंतर २०१४ मध्ये तिने बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सुप्रसिद्ध ङायरेक्टर आणि यशराज फिल्म्सचे चेअरमन आदित्य चोपडा यांसोबत विवाह केला. नव्वदीच्या दशकात अनेक अभिनेत्रींनी बॉलीवुडच्या मायानगरीत आपल्या अभिनयाने व नखशिखांत सौंदर्याने राज्य केले.

अशीच एक अभिनेत्री म्हणजे राणी मुखर्जी. आपल्या करियरच्या कारकीर्दीत राणी मुखर्जी हिने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. आपली मुलगी अदिरा हिच्या जन्मानंतर राणी मुखर्जी ही अगदी मोजक्या चित्रपटांमध्ये दिसली. राणी मुखर्जी ने आपली मुलगी आदिराचा तिसरा वाढदिवस नुकताच साजरा केला. आदिराचा वाढदिवस तिने एक जंगी पार्टी देऊन मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. पार्टीमध्ये बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी आपल्या लहान मुलांसोबत हजेरी लावली.

या पार्टीचे वैशिष्ट्य असे की या पार्टीच्या निमित्ताने आदित्य चोपडा आपली मुलगी अदिरा सोबत पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर आले. रानी मुखर्जी आणि आदित्य चोपडा यांनी आपली मुलगी आदिरा ला नेहमीच प्रसारमाध्यमांपासून दूर ठेवले. यामुळेच अन्य स्टार किड्स प्रमाणे आत्तापर्यंत अदिरा चे कोणतेही छायाचित्र प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले नव्हते.आदिराचे आपल्या वडिलांसोबतचे छायाचित्र प्रसारमाध्यमांमध्ये आणि चाहत्यांमध्ये चांगलेच व्हायरल झाले आहे. या छायाचित्रांमध्ये आदिरा आदित्य चोप्रा यांच्या कडेवर असून हे पहिले छायाचित्र आहे ज्यामध्ये आदिराचा चेहरा स्पष्ट दिसत आहे.

आदिरा जणू काही राणी मुखर्जीची कार्बन कॉपी आहे असे त्यांनी म्हटले आहे. राणी मुखर्जी आणि आदित्य चोपडा यांची मुलगी आदिराचा जन्म मुंबईत झाला. राणी मुखर्जी आणि त्यांच्या कुटुंबियांकडून आदिराचे कोणतेही छायाचित्र प्रसार माध्यमांना पुरवले गेले नव्हते मात्र तिच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने राणी मुखर्जीने तिच्यासाठी एक संदेश आणि तिचे छायाचित्र निश्चितच शेअर केले होते .मात्र यामध्ये तिच्या चेहरा स्पष्ट दिसत नव्हता.

राणी मुखर्जी आपल्या मुलीच्या पालन पोषण आणि संगोपनाच्या बाबतीत खूपच प्रोटेक्टीव आहे हे तिने स्वतः एका मुलाखतीमध्ये सांगितले. या मुलाखतीमध्ये तिने सांगितले होते की ती आणि आदित्य चोप्रा आदिरा ला सर्वसामान्य मुलांप्रमाणे वाढवण्यावर भर देत आहेत. तिला तिच्या आईच्या किंवा वडिलांच्या नावाने ओळखले जाऊ नये अशी आमची इच्छा असून तिला तिच्या जीवनामध्ये तिच्या स्वतःच्या क्षमतेनुसार जे काही मिळवले आहे त्यामुळे जगाने ओळखावे अशी आमची इच्छा आहे असे तिने सांगितले.

आदिरा अजून खूप लहान आहे मात्र जेव्हा ती मोठी होईल तेव्हा जीवनाच्या चढ-उतारांचा मध्ये एखादी गोष्ट तिच्या मनाविरुद्ध घडली तर ते पचवण्याची ताकद यावी असे आम्हाला वाटते. २०१४ साली राणी मुखर्जी ने चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक व यशराज प्रॉडक्शन चे चेअरमन आदित्य चोपडा यांच्यासोबत विवाह केला. विवाहानंतर तिचे फारसे दर्शन चित्रपटांमध्ये होत नाही मात्र मर्दानी या चित्रपटातून तिने पुन्हा एकदा आपल्या अभिनयाचे नाणे चित्रपट सृष्टीमध्ये खणखणीत असल्याचे दाखवून दिले.
स्वप्नील लव्हे

Exit mobile version