“सुपरस्टार्स किडचं लव्हलाइफ पुन्हा चर्चेत एकदा घटस्फोट झाला आता पुन्हा दुसरीच्या प्रेमात…”

प्रतीक आता पुन्हा प्रेमात पडला आहे. प्रतीकचं नवं लव्हलाइफ सुरू झालं आहे. आता त्याची नवी गर्लफ्रेंड कोण, तिचं नाव काय, ती बॉलिवूडमधली अभिनेत्री आहे की रँपवरची मॉडेल अशा अनेक प्रश्नांनी नेटकऱ्यांची उत्सुकता ताणली आहे. गर्लफ्रेंडसोबतचे प्रतीकचे फोटो सोशलमीडियावर व्हायरल होत असल्याने ही चर्चा वेगाने सुरू झाली आहे.

२०१९ च्या जानेवारीमध्ये प्रतीक बब्बरने सान्या सागरशी लग्न केले होते. त्याआधी तो सान्याला बरेच दिवस डेट करत होता, मात्र त्यांचा संसार वर्षभरही टिकला नाही. त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. तेव्हा प्रतीकच्या घटस्फोटाचीही खूप चर्चा झाली होती. आता सान्याच्या आठवणीतून तो बाहेर पडला असून बार बार देखो फेम अभिनेत्री प्रिया बॅनर्जी प्रतीकच्या आयुष्यात आली आहे. प्रतीक प्रियाला डेट करत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले आहे.

अर्थात अजून प्रतीकने त्याच्या या नव्या रिलेशनशीपला दुजोरा दिला नसला तरी खूप ठिकाणी ही जोडी एकत्र फिरताना दिसल्याने चर्चेला उधाण आले आहे.सान्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर वर्षभरातच प्रतीक आणि प्रिया एकमेकांच्या सहवासात आल्याचे प्रतीक बब्बरच्या एका जवळच्या मित्राने सांगितले आहे. एका कॉमन मित्राच्या पार्टीत प्रतीक आणि प्रियाची ओळख झाली. ते प्रेमातही पडले.

इतकच नव्हे तर प्रियाशी लवकरच लग्न करण्याचाही प्रतीकचा विचार असल्याने त्याने कुटुंबीयांना प्रियाविषयी सांगितले आहे. पण सध्या तरी प्रतीकने हे नातं जाहीर केलेलं नाही. प्रतीकची नवी गर्लफ्रेंड प्रिया हिने संजय गुप्ता यांच्या जज्बा या सिनेमात सिया ही भूमिका केली करत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तर प्रतीक लवकरच वो लडकी है कहा या सिनेमात अभिनय करताना दिसणार आहे.

यामध्ये तापसी पन्नू आणि प्रतीक गांधी यांच्याही भूमिका आहेत. ह्या सर्व गोष्टींमुळे आता अभिनेता प्रतीक बब्बर चांगलाच चर्चेत आलेला पाहायला मिळत आहे. अभिनेत्री स्मिता पाटील आणि अभिनेता राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक लवकरच पुन्हा लग्न करणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. एकीकडे बॉलिवूडमधील नेपोटिझमवर कडकडून टिका होत असताना, प्रसिध्द कलाकारांच्या मुलांना काही केल्या ब्रेक मिळत नसल्याचंही चित्र आहे.

स्टारकिडचं लेबल असूनही प्रतीक बब्बर हे नाव बॉलिवूडमध्ये स्थान मिळवू शकलं नाही त्याची कारण वेगळी असतील पण अभिनेत्री स्मिता पाटील आणि अभिनेता राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर त्याच्या नव्या सिनेमापेक्षा व्यक्तीगत आयुष्यामुळेच जास्त चर्चेत असतो. आता पुन्हा प्रतीक बब्बर त्याच्या लव्हलाइफमुळे चर्चेत आला आहे. प्रतीक बब्बर आता पुन्हा लाइमलाइटमध्ये येण्याचं कारण त्याचा नवा सिनेमा नव्हे तर नवं प्रेम आहे. तीन वर्षापूर्वी सान्या सागरशी लग्न करून अवघ्या वर्षभरात तिच्यापासून घटस्फोट घेतलेला.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *