गॅरी म्हणजेच अभिजित च्या बायकोचे स्वीमसूट फोटो वायरल

आतापर्यंत सुखदानं तिचे ग्लॅमरस, सोज्वळ रुपातील फोटो पोस्ट केले आहेत. मात्र आता सुखदानं तिचा बोल्ड अँड ब्युटीफुल स्वॅग दाखवणारे फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण सुखदानं काळ्या रंगाच्या स्विम सूटमधले फोटो शेअर केले आहेत. सुखदानं तिच्या या बोल्ड अंदाजामुळे सोशल मीडियावर अनेकाचं लक्ष वेधून घेतलं आहे.सुखदाने स्विमिंग पूलजवळ ग्लॅमरस पोज दिल्या आहेत. काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये सुखदा खूपच बोल्ड दिसत आहे.

हिरवागार निसर्ग आणि स्विमिंग पूलमधलं निळंशार पाणी या पार्श्वभूमीवर सुखदाचा लूक अधिकच हॉट दिसत आहे. बिकनी लूकमधील हे फोटो शेअर करताना सुखदानं ‘जो कहना चाहिए था… वह कहा नहीं.. दिल लगा नहीं’ या ओळी लिहिल्या आहेत. अभिनेत्री सुखदा खांडकेकरनं हिंदी तसचं मराठी मालिकांत काम करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या सुखदा ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ मालिकेत दिसत आहे.

अभिनयाबरोबरच सोशल मीडियावरदेखील सुखदा खूपच सक्रीय असते. सुखदा सतत तिचे सुंदर आणि ग्लॅमरस फोटो शेअर तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. मुळातच देखण्या असलेल्या सुखदाच्या फोटोंना चाहते भरभरून कमेन्ट आणि लाइक्स करत असतात. अभिजीत आणि सुखदा यांचं लव्ह मॅरेज आहे. एका कॉमन फ्रेंडमुळे या दोघांची ओळख झाली आणि त्यानंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात अन् पुढे लग्नात झालं.आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याच्या जोरावर अभिनेत्री नृत्यांगना सुखदा खांडकेकर मराठी आणि हिंदी रंगभूमी गाजवत आहे.

अभिनेत्री असण्यासोबतच ती उत्तम नृत्यांगना आहे. तिने कथ्थक या नृत्यप्रकाराचं प्रशिक्षण घेतलं आहे.सुखदाने काही मालिका, नाटक आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.सुखदाने ‘देवदास’, ‘कनुप्रिया’, ‘डूबधान’, ‘धारा की कहानी’ आणि ‘उमराव’ अशा हिंदी नाटकांमध्येही तिनं काम कंल आहे. तिचं ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ हे नाटक विशेष गाजलं.विजय केंकरे यांच्या ‘हीच तर प्रेमाची गंमत आहे’ आणि मकरंद देशपांडे यांच्या ‘शेक्सपिअरचा म्हातारा’ या मराठी नाटकातून तिनं काम केलं होतं.संजय लीला भन्साली यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातही तिनं काम केलं आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *