“वनिता पडली कुणाच्या प्रेमात….हास्यजत्रैतील वनिताला झाला लव्हेरिया!”

आता मराठी मनोरंजन विश्वामध्ये अनेक कलाकार लग्नाच्या बेडीमध्ये अडकु लागले आहेत. जीव रंगला फेम हार्दिक जोशी-अक्षय देवधर लवकरच बोहल्यावर चढणार आहेत. काही दिवसांपूर्वी भाग्यश्री मोटेचा साखरपुडा दणक्यात झाला. तर आता महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमामुळे घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री वनिता खरात देखील प्रेमात पडली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तिनं आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.

मराठीसह हिंदी सिनेमात स्वत:च्या अभिनयानं एक वेगळं स्थान वनितानं निर्माण केलं आहे. सध्या वनिता महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचली आहे. तिच्या विनोदबुद्धीचं प्रेक्षकही भरभरून कौतुक करत आहेत. शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ सिनेमात तिनं साकारलेल्या भूमिकेमुळे आजही अनेकांच्या ती लक्षात आहे.

रंग, रुप किंवा देहयष्टीच्या परंपरागत चौकटी मोडत वनितानं अंगभूत अभिनयाच्या जोरावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या अभिनयाचं प्रेक्षकही भरभरून कौतुक करत आहे. अशीही गुणी अभिनेत्री प्रेमात पडली आहे. त्याची कबुली खुद्द वनितानं सोशल मीडियावर पोस्ट करून दिली आहे. वनितानं तिच्या बॉयफ्रेंडच्या वाढदिवसाचं निमित्त साधत इन्स्टाग्रामवर त्या दोघांचा सुंदर फोटो शेअर केला आहे.

हा फोटो पोस्ट करत तिनं दोघाचं एकमेकांवर प्रेम असल्याचं जाहीर केलं आहे. वनिताच्या बॉयफ्रेंडचं नाव सुमित लोंढे असं आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्तानं वनितानं पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं सुंदर शायरी शेअर केली आहे. तिनं लिहिलं आहे की, कुछ तूने सी है मैंने की हैं रफू….ये डोरियां …….हॅप्पी बर्थडे ‘साथी’ तिने अनेक हॅशटॅगही दिले आहेत.

वनितानं शेअर केलेल्या या पोस्टवर मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्यात समीर चौगुले, नम्रता संभेराव, ओंकार राऊत यांचा समावेश आहे. वनिताचा प्रियकर सुमित लोंढे हा एक व्हिडिओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे. सुमितनं याआधी वनिताच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली होती. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील अनेक मंडळीही सुमितला ओळखतात. त्यांचे अनेक फोटोही त्याने शेअर केले आहेत. पुढील जिवनासाठी वनितास शुभेच्छा!

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *