“रतन टाटांनी लग्न का केलं नाही? त्यांचं कुणावर होतं प्रेम?”

भारतभरातचं नव्हे तर जगभर आदराचे स्थान असलेले जगप्रसिद्ध उद्योजक आणि टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्या खासगी आयुष्याचीही तितकीच चर्चा आजवर झालेली आहे. वयाच्या ८४’व्या वर्षीही रतन टाटा सिंगल आहेत. त्यांनी काही कारणांमुळं लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या आयुष्यातील काही घटनांमुळं त्यांची लव्ह स्टोरी अधुरी राहिली.

असं नाही की रतन टाटा फक्त एकदाच प्रेमात पडले होते. रतन टाटा यांचं नाव अभिनेत्री सिमी गरेवाल यांच्याशी जोडलं गेलं होतं. सिमी गरेवाल आणि रतन टाटा सिरियस रिलेशनशिपमध्ये होते. सिमी गरेवाल यांनी अनेकदा त्यांच्या नात्याचा उल्लेख केला आहे. ‘कर्ज’ आणि ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटांतून सिमी गरेवाल चर्चेत आल्या होत्या.

त्यांच्या ग्लॅमरची जितकी चर्चा झाली तितकीच त्यांच्या खासगी आयुष्याचीही झाली. त्यांचे रिलेशन्स आणि लग्न नेहमीच गॉसिपचा विषय राहिला आहे. सिमी गरेवाल यांचा पहिला विवाह उद्योगपती रवी मोहन यांच्याशी झालं होतं. परंतु त्यांचं हे नातं फार काळ टिकलं नाही. त्यांनी घटस्फोट घेतला. ११ वर्षांपूर्वी ईटाइम्सला दिलेल्या एका मुलाखतील सिमी यांनी रतन टाटा यांना डेट केल्याचं सांगितलं होतं.

दोघांचं नातं खूप खास होतं. दोघं खूप वर्षे एकत्र होते. सिमी यांनी रतन टाटा यांचं कौतुक करताना म्हटलं होतं की, ‘रतन आणि मी खूप वर्षे एकत्र होतो. ते एकदम परफेक्ट आहेत. त्यांचा सेन्स ऑफ ह्यूमर कमाल आहे. ते एकदम जेंटलमेन आहेत. पैसा त्यांच्यासाठी कधीही महत्त्वाचा नव्हता. परदेशात ते जितके रिलॅक्स असतात, तेवढे ते भारतात नसतात, असं ही त्या म्हणाल्या होत्या.

सिमी गरेवाल यांनी त्यांचं आणि रतन टाटा यांचं नातं नेमकं का तुटलं याबद्दल काही भाष्य केलं नाही. पण त्या आजही त्यांचा आदर करतात. त्याचं कौतुक करताना थकत नाहीत.या मुलाखतीतल सिमी गरेवाल यांनी त्यांच्या पहिल्यालग्नाबद्दलही भाष्य केलं होतं. ‘माझं लग्न झालं तेव्हा मी २७ वर्षांची होते. तीन महिने लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर आम्ही लग्न केलं होतं. तेव्हाच मला समजलं होतं की, हे लग्न फार काळ टिकणार नाही. आम्ही दोघंही फार वेगवेगेळे होतो. लग्नानंतर घर आणि काम सोडायला हवं, हा विचारंच चुकीचा आहे, असं सिमी यांनी म्हटलं होतं. आदरणीय रतन टाटा साहेबांच्या निरोगी आणि चैतन्यमय आयुष्यासाठी प्रार्थना! 👏🏻😊

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *