“गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड गाजवलेली ही प्रसिध्द व्यक्ती आहे ह्या अभिनेत्रीची बहीण…..”

प्रसिध्द मराठी अभिनेत्री स्पृहाने बालमोहन विद्यामंदिर येथून शालेय शिक्षण घेतले त्यानंतर रुईया कॉलेजमधून शिक्षण घेत असताना विविध नाटकांतून काम केले. स्पृहाची धाकटी बहीण “क्षिप्रा जोशी” ही भारतातील प्रसिद्ध व्यक्ती आहे. क्षिप्रा जोशीने देखील बालमोहन विद्यामंदिर तसेच रुईया कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे. इतिहास विषयातून तिने बीएची पदवी मिळवली आहे.

इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट मुंबई येथून तिने स्पोर्ट्स मॅनेजमेंटचा डिप्लोमा केला आहे. भारतीय जिम्नॅस्टिक प्लेअर म्हणून क्षिप्राने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. २०१० सालच्या विश्व जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप मध्ये तिने सहभाग घेतला होता. प्रीमिअर रिदमीक जिम्नॅस्टिक अकॅडमी येथे ती सिनिअर कोच म्हणून कार्यरत आहे. आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक महासंघ अंतर्गत आंतरराष्ट्रीय स्तरावर जजची भूमिका तिने निभावली होती.

२१ मार्च २०११ रोजी एका मिनिटामध्ये ‘१८० डिग्री बॅलन्स पोजीशन’ मधून स्वतःभोवती तब्बल १८ वेळा फेऱ्या मारण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तिने बनवला होता. त्यावेळी महाराष्ट्र शासनाने क्षिप्राचा ‘शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला होता. हा महाराष्ट्र शासनाचा खूपच मोठा पुरस्कार मानला जातो. “मायबाप” या मराठी चित्रपटातून अभिनेत्री स्पृहा जोशी हिने मराठी सृष्टीत पदार्पण केले होते.

अग्निहोत्र, एका लग्नाची दुसरी गोष्ट, एका लग्नाची तिसरी गोष्ट, प्रेम हे, लॉस्ट अँड फाउंड, उंच माझा झोका, सूर राहू दे, बायोस्कोप, मला काहीच प्रॉब्लेम नाही, समुद्र, नंदिनी, लहानपण देगा देवा, होम स्वीट होम यासारख्या चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. स्पृहा जोशी ही उत्कृष्ट अभिनेत्री, होस्ट यासोबतच उत्कृष्ट कवयित्री देखिल आहे.चांदणचुरा, लोपामुद्रा हे तिचे कवितासंग्रह आहेत.

यासोबतच तिने उत्तम कामगिरी करून अनेक राज्यस्तरीय पुरस्कार तिने प्राप्त केली आहेत. अनेक वर्षांच्या मेहनतीचे फलित म्हणून क्षिप्राने इंडियन रीदमीक जिम्नॅस्टिकच्या कॅप्टनपदाची धुरा सांभाळत असताना आज ती एक सिनिअर कोच म्हणून नावलौकिक करताना दिसत आहे. यातून नव्या पिढीला आपल्या अनुभवांची शिदोरी पोहोचवुन त्यांच्यामध्ये नवी उमेद निर्माण करण्याचा ती प्रयत्न करताना दिसते.

राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उंचावणाऱ्या क्षिप्रा जोशीच्या या यशस्वी कारकिर्दीचा सर्वांनाच अभिमान वाटावा असाच आहे. काही वर्षांपूर्वी तिने म्युजिक कंपोजर आणि साउंड डिझायनर असलेल्या कल्पेश मोरे याच्यासोबत लग्नगाठ बांधली. तिच्या लग्नाचे अनेक फोटो व्हायरल देखील झाले होते. पती कल्पेश हा पत्नी क्षिप्रा जोशी हिला नेहमीच प्रोत्साहन देताना पाहायला मिळतो. त्याच्यामुळेच हे सर्व काही शक्य असल्याचं दिसून येत. कल्पेश आणि क्षिप्रा ह्या जोडीस! आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *