” ‘काहे दिया परदेस’ फेम सायली संजीव हिने अंगावर ईथे काढलेल्या टॅटूवर चाहत्यांची नाराजी!”

“काँटा लगाऽऽऽ!” म्हणत धप्पकन शिक्का मारण्यापासुन सुरु झालेला टॅट्टुचा हा प्रवास…..आता अभिनेत्रींचे हटके टॅटू साऱ्यांचेच लक्ष्य वेधून घेताना दिसतात. या टॅटूची नेहमीच चर्चा झालेली पाहायला मिळते. ऋता दुर्गुळे, श्रेया बुगडे, रुचिता, प्रार्थना बेहरे, परी तेलंग या सर्वांच्या टॅटूने अगोदरच प्रेक्षकांना भुरळ घातलेली पाहायला मिळाली होती.

अगदी आताच अजूनही बरसात आहे या मालिकेतील अभिनेत्री ‘शर्मिला राजाराम शिंदे’ हिने देखील मानेच्या खालील बाजूस जिनचा जादुई ‘चिराग’ हा सुंदरसा टॅटू काढून घेतला आहे. तिचा हा कलरफुल टॅटू तिच्या चाहत्यांना देखील खूपच आवडला आहे. शर्मिला राजाराम हिच्याप्रमाणे अभिनेत्री “सायली संजीव” हीने देखील नुकताच एक टॅटू आपल्या पायावर काढून घेतला आहे.

घुबडाचा टॅटू काढल्याने सायली संजीवला ट्रोलिंगला सामोरे जावे लावत आहे. ‘घुबड कशाला काढलस?’…’घुबड अपशकून आहे’.. मी जर घुबड टँटू म्हणून काढला तर अपशकुन म्हणून आई मला घराबाहेर काढेल. ‘ सायली तू महालक्ष्मीच्या वाहनाला पायावर ठेवलं’… या आणि अशा कित्येक प्रतिक्रिया देऊन तिच्या चाहत्यांनी सायलीला ट्रोल केले आहे. तर अनेकांनी तिच्या ह्या टॅटूचे कौतुक देखील केलं आहे.

घुबडाचे दर्शन भारतात अशुभ मानले जाते तर परदेशात त्याला शुभ मानले जाते. घुबड हा पक्षी दिसायला भयावह असला तरी तो अतिशय बुद्धिमान आहे आणि म्हणूनच लक्ष्मीने स्वतःचे वाहन म्हणून त्याची निवड केली आहे. सायली संजीवचा घुबडाचा हा टॅटू छोटासा असला तरी तो खरोखर खूपच आकर्षण वाटत आहे. त्यामुळे चाहत्यांच्या ट्रोलिंगला सायलीने अजूनही कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही. अभिनेत्री काहीही करोत त्यांना ट्रोल करणे हे साहजिकच आहे परंतु त्यात अधिक गुंतून न राहता आपले आयुष्य मर्जीप्रमाणे जगणे हेच कलाकारांनी शिकले पाहिजे. असोत! सायलीला तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *