ताज हाॅटेलने एकेकाळी नोकरी द्यायला केली होती मनाई! पुढे झाला मोठा स्टार

कादरखानसोबतची जुगलबंदी आणि सगळचं एकुण नं.०१ सोबतीला जबरदस्त डान्स, दमदार अ‍ॅक्शन आणि रंगीबेरंगी चमकदार कपडे, असा रुबाबदार होता ८० आणि ९०च्या दशकातील गोविंदा. त्यावेळी गोविंदा जे करत होता, ते शाहरुख खान किंवा आमिर दोघांनाही करता आले नाही. गोविंदासमोर सलमानची बॉडी आणि अक्षय कुमारची धमाकेदार अ‍ॅक्शन फिकी पडली.

गोविंदाचा हा प्रवास एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नव्हता. विरारमधली गरिबी आणि स्वतःच्या नावाची गगनभरारीही त्यांनी पाहिली. २१ डिसेंबर १९६३ रोजी मुंबईत जन्मलेल्या गोविंदाला एकदा ताज हॉटेलमध्ये देखील नोकरी नाकारण्यात आली होती. गोविंदाचे वडील अरुण कुमार आहुजा हे त्यांच्या काळात प्रसिद्ध कलाकार होते. त्यांनी ३०-४० चित्रपटांमध्येही काम केले. त्याच वेळी, गोविंदाची आई निर्मला देवी शास्त्रीय गायिका होत्या, त्या चित्रपटांमध्ये गायच्या.

एका चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान गोविंदाच्या वडिलांचे मोठे नुकसान झाले आणि त्यांना त्यांचा राहता बंगला सोडून मुंबईतील विरारला स्थायिक व्हावे लागले. गोविंदा वाणिज्य शाखेत पदवीधर होता आणि नोकरीसाठी अनेक ठिकाणी फिरला होता. नोकरीच्या शोधात तो एकदा ताज हॉटेलमध्ये पोहोचला, तेव्हा त्याला नकार देण्यात आला. एका लाईव्ह शोदरम्यान गोविंदाने सांगितले होते की, एकदा त्याच्या आईला कुठेतरी जायचे होते आणि तो तिच्यासोबत मुंबईतील खार स्टेशनवर लोकल ट्रेनची वाट पाहत होता.

गाड्या तुडुंब भरून आल्या. गर्दीमुळे त्याने अनेक गाड्या सोडल्या. याचं दुःख होऊन गोविंदा ताबडतोब एका नातेवाईकाकडे धावला आणि त्याच्याकडून काही पैसे उसने घेऊन आईला फर्स्ट क्लासचा पास मिळवून दिला. या घटनेने गोविंदा हादरला आणि त्यानंतर तो सर्व काही विसरून कामाला लागला. ८०च्या दशकात त्याला प्रथम एल्विन नावाच्या कंपनीची जाहिरात मिळाली आणि त्यानंतर तो कधीही थांबला नाही आणि त्याने कधीही मागे वळून पहिले नाही.

१९८६ मध्ये त्याचा पहिला चित्रपट ‘ईल्जाम’ रिलीज झाला आणि मोठ्या पडद्यावर त्याच्या नावाचा दबदबा निर्माण झाला. आपल्या करिअरमध्ये गोविंदाने जवळपास १६५ चित्रपटांमध्ये काम केले. त्याला ११ वेळा फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. सर्वोत्कृष्ट कॉमेडियनचा फिल्मफेअर पुरस्कारही जिंकण्यात त्याला यश मिळाले. त्याचबरोबर त्याने आपल्या कारकिर्दीत चार वेळा ‘झी सिने’ पुरस्कारही पटकावला आहे. गोविंदास हसर्या विनोदी शुभेच्छा!

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *