NMJOKE

धोनी सचिन आणि राहणे सोबत असलेला हा क्रिकेटर आहे मराठी सृष्टीत अभिनेत्रीचा नवरा!

MS धोनी, अजिंक्य रहाणे ह्यांच्या सोबतची ही व्यक्ती नक्की कोण आहे असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल? तर हा व्यक्ती आहे सर्वेश दामले. सर्वेश दामले हा राईट हॅन्ड बॅट्समन आहे डॉ डी वाय पाटील यांच्या स्पोर्ट्स अकॅडमीमधून त्याने प्रशिक्षण घेतले आहे. डी वाय पाटीलच्या ब संघाकडून तो वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये खेळत असतो.

टाइम्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेत सर्वेश दामलेने सिद्धेश लाडसोबत शतकी खेळी खेळली होती. गेली अनेक वर्षे क्रिकेट क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्वेशची अनेक स्टार खेळाडूंसोबत मैत्री झाली. सिद्धेशची पत्नी धनश्री प्रधान दामले ही मराठी सृष्टीतील एक गुणसंपन्न निवेदिका, मुलाखतकार तसेच अभिनेत्री म्हणून नावारूपाला आलेली आहे.

धनश्रीचे बालपण ठाण्यासारख्या सांस्कृतिक शहरात गेले.सरस्वती विद्यामंदिर ही तिची शाळा त्यामुळे बालपणापासूनच मराठी भाषेवरील प्रभुत्व वाढत गेले. रामणारायन रुईया कॉलेजमधून अर्थशास्त्र विषयातून बीएची पदवी मिळवल्यानंतर वकीलीचे शिक्षण घेतले. सुरुवातीला निवेदन क्षेत्रात येईल असे तिला अजिबात वाटले नव्हते पण रुईयाचं वातावरण कलामय होतं.

तिच्या ग्रुप मधल्या मित्रमैत्रिणी सर्वजण नाटकात काम करत होते ते तिला नेहमी या क्षेत्रात येण्यास सांगायचे. रात्रीअपरात्री रिहलसल मग त्यानंतर घरी जायचं, घरच्यांना संजवायचं, मग अभ्यास करायला वेळ मिळणार नाही हे तिला मुळीच पटत नव्हते त्यामुळे तिने या क्षेत्रात येण्याला नकार दिला होता. पण एके दिवशी मित्राचा फोन आला माहिमला एका कार्यक्रमासाठी ऑडिशन आहे तू जाशील का? हो किंवा नाही हे ऑडिशन दिल्यानंतर ठरव असे त्याने सांगितले.

ह्या क्षेत्रात यायचं नाही हे धनश्रीने अगोदरच ठरवून ठेवले होते त्यामुळे ओडिशनच्या वेळी मला ऍक्टिंग मधलं काहीच येत नाही असं तिने बिनधास्तपणे सांगून टाकलं होतं. शाळेत आणि आज्जी आजोबांकडून मराठी भाषेचं ज्ञान मिळालं होतं त्यामुळे तिचं मराठी भाषेचं ज्ञान अस्खलित होतं. तिचं हे टॅलेंट पाहून फायनल पाच मुलींमधून तिचे सिलेक्शन करण्यात आले.

‘हीच माझी मैत्रीण’ या कार्यक्रमात निवेदन करायचं आहे ही बातमी तिने फोनवरून आईला कळवली. त्यावेळी धनश्रीचे वडील मीडिया क्षेत्रात होते त्यामुळे या क्षेत्रात तुम्ही चांगलं राहिलात तर हे क्षेत्र चांगलं आहे असे त्यांनी स्पष्ट केले होते. अँकरिंग करायला घरून परवानगी मिळाली आणि निर्धास्तपणे वन टेक शूट करणारी धनश्री प्रत्येकाच्याच मनात स्थान निर्माण करून गेली. लग्नानंतर एक वर्ष गॅप घेतलं पण आपल्याला ह्या क्षेत्रात काम करायचंय हे तिला स्वस्थ बसू देत नव्हतं.

त्यानंतर धनश्रीने विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून निवेदिका, सूत्रसंचालन, मुलाखतकार म्हणून नेटाने जबाबदारी पार पाडली. दिवाळी पहाट, लाईव्ह कार्यक्रम, दूरदर्शनवरील कार्यक्रम , ईटीव्ही मराठी वरील अनेक कार्यक्रमासाठी तिला निवेदिका म्हणून काम करता आले. ‘सुगरण’ या कार्यक्रमातून धनश्री प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. समीरा गुजर, संपदा जोगळेकर, मंगला खाडिलकर, दीप्ती बर्वे यांनी निवेदन आणि सूत्रसंचालन क्षेत्रात नाव कमावलं आहे.

याच यादीत धनश्रीने देखील स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तिच्या या कार्याची दखल घेऊन सीकेपी गुणिजन पुरस्कार तसेच ठाणे वैभव आणि कलानिधीच्या Woman of substance पुरस्काराने तिला गौरविण्यात आले आहे. APAC ची ती ब्रँड ऍब्यासिडर अशी तिची ओळख आहे. स्वामी समर्थ यांच्या जीवनावर आधारित ‘हम गया नहीं जिंदा है’ या चित्रपटात धनश्रीने अभिनय साकारला आहे. ह्या गुणी जोडप्यास भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

Exit mobile version