“देवमाणुस” ह्या कलाकारांचे खरे नाव व वय…

झीटीव्ही मराठी वाहिनीवर देवमाणूस चा दुसरा भाग नुकताच सुरू झाला आहे. या भागामध्ये अतिशय रंजक घटना-घडामोडी होताना दिसत आहेत. या मालिकेत देव माणूस म्हणजेच अजित कुमार देव हा देखील आहे. मात्र तो बनावट नाव धारण करून गावात सध्या वावरत आहेत नटवर सिंह हे त्यांचे नाव धारण केले आहे आणि तो इतके दिवस राजस्थान येथे राहायला होता आता मालिकेमध्ये पुढे काय होणार आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत मात्र हळूहळू कथानक आता सुरू होत आहे.

देव माणूस या मालिकेच्या दुसऱ्या भागाची जाहिरात देखील खूप मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. अनेक शहरांमध्ये या मालिकेचे मोठमोठे होल्डिंग सुद्धा लावण्यात आलेले आहेत त्यामुळे मालिका लोकप्रिय ठरणार यात वाद नाही. आज आम्ही आपल्याला या लेखामध्ये या मालिकांमध्ये, काम करणाऱ्या कलाकारांची खरे वय सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊया.

1) डिंपल – अस्मिता देशमुख देव माणूसच्या दुसर्‍या भागामध्ये सध्या दिसत आहे. या मालिकेमध्ये तिने डिंपल ही भूमिका साकारली आहे. ती एका भागासाठी तब्बल २२ हजार रुपये आकारते. विशेष म्हणजे अस्मिता देशमुखचे वय देखील २३ वर्ष आहे. आपले फोटो‌ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. 2) सरू आजी – रुक्मिणी सुतार देव माणूस दोन या भागातही अभिनय करताना दिसत आहेत. त्यांनी मालिकेमध्ये सरू आजींची भूमिका साकारली आहे. रुक्मिणी सुतार एका भागासाठी १३ हजार रुपये घेतात. त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले आहे त्यांचे वय सध्या ७१ वर्षे आहे.

3) मंगल – अंजली जोगळेकर यांनी देखील या मालिकेत जबरदस्त असे काम केले आहे. त्यांनी या मालिकेमध्ये मंगलची भूमिका साकारली आहे. रियल लाईफ मध्ये त्या अतिशय सुंदर आहेत. एका भागासाठी त्या १४ हजार रुपये मानधन घेतात. त्यांचे वय ४५ वर्षाचे आहे. 4) टोण्या – विरल माने हा देखील मालिकेच्या दुसर्‍या भागामध्ये दिसत आहे. त्याने टोण्याची भूमिका साकारली आहे. तो एका भागासाठी ७ हजार रुपये मानधन घेतो. विरल याचं वय केवळ बारा वर्षे आहे. बारा वर्षे वय असताना देखील तो अतिशय जबरदस्त से काम या मालिकेत करत आहे.

5) बाबू दादा – अंकुश मांडेकर हे देव माणूसच्या दुसऱ्या भागात देखील दिसत आहेत. त्यांनी बाबू दादाची भूमिका साकारली आहे. अंकुश मांडेकर हे एका भागासाठी ११ हजार रुपये मानधन घेतात. त्यांचे वय ५७ वर्षे असून ते या वयातही जबरदस्त काम करतात. 6) बज्या – किरण डांगे हादेखील देवमाणूसच्या दुसऱ्या दिसला आहे. किरण डांगे याने बज्याची भूमिका साकारली आहे. किरण डांगे हा एका भागासाठी १९ हजार रुपये मानधन घेतो. किरण भांगे याचे वय ते तीस वर्ष आहे. 7) नटवर सिंह – किरण गायकवाड हा देव माणूस म्हणजेच अजितकुमार देव च्या भूमिकेत दिसत आहे. किरण गायकवाड हा एका भागासाठी तब्बल ३५ हजार रुपये मानधन घेतो. किरण गायकवाड याने देव माणूस दुसर्‍या भागामध्ये नटवर सिंह हे पात्र साकारले आहे. किरण गायकवाड यांचे वय सध्या २९ वर्ष आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *