“दादा कोंडकेंनी आपल्या प्रेयसीचा असा बदला घेतलेला…..”

दादा कोंडकेंसोबत एकेकाळी मराठी सिनेमा गाजवणारी ही अभिनेत्री आता ६७वर्षांची झालीय. ‘सोंगाड्या’, ‘पांडू हवालदार’, ‘पळवा पळवी’, ‘गनिमी कावा’ असे विविध चित्रपट उषा यांनी मराठी प्रेक्षकांना दिले. दादा कोंडकेंसोबत त्यांनी जोडीने प्रेक्षकांना चकधुम करत खळखळून हसवले. पण या जोडीमध्ये कटूताही आली होती.

मीडियाच्या रिपोर्ट्सनुसार दादा कोंडके विवाहित होते पण ते नेहमी अविवाहित म्हणूनचं वावरले. असे बोलले जाते की त्यांना उषा चव्हाण यांच्याशी लग्न करायचे होते, पण उषा यांची तशी इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी नकार दिला. दादांना हा नकार पचवता आला नाही. त्यांनी यामुळे उषा यांच्यावर सूड उगवला. दादांनी त्यांच्या बायोग्राफीमध्ये उषा यांच्याविषयी काही वाईट गोष्टी लिहिल्या.

उषा यांनी त्यांच्या एका ब्लॉगमध्ये ६-७ वर्षांपूर्वी ही गोष्ट नमुद केली होती. त्यांनी असे म्हटले होते की हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात कठीण काळ आला होता. दादा कोंडकेंच्या या वादग्रस्त पुस्तकाचे नाव ‘एकटा जीव’ असे होते. त्यांनी केवळ उषाच नव्हे तर इतरही कलाकारांविषयी वाईट लिहिले होते. रिपोर्ट्सनुसार दादांना हे पुस्तक प्रकाशित करायचे नव्हते, पण त्यांच्या मृत्यूनंतर हे पुस्तक प्रकाशित केले गेले. या वादग्रस्त पुस्तकावर बंदी घालण्यात आली होती.

सडेतोड असलेले दादा आपल्या मराठी चित्रपटासाठी थिएटर मिळत नसल्याची तक्रार घेवुन मा.बाळासाहेब ठाकरेंकडे गेले होते. व बाळासाहेबांनी मराठीचा मुद्दा प्रखरपणे ऊचलत थिएटर मालकाला हिंदी चित्रपट ऊतरवुन मराठी चित्रपट लावायला भाग पाडले होते. व तो आणि पुढचे कैक सिनेमे सिल्वर-गोल्डन ज्युबिली साजरी करु लागले. ज्याची परतफेड कट्टर शिवसैनिक बनलेल्या दादांनी आपल्या चित्रपटातही शिवसेनेस लोकप्रियता मिळवुन दिली आणि अखेरपर्यंत जाहिर सभांतुन शिवसेनेचा प्रखर पुरस्कार करीत राहिले.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *