“चिंगी झालीय मोठी….बघा आभाळमायाची ही कलाकार आता किती सुंदर दिसते!”

आभाळमाया या मालिकेतून स्वरांगी चिंगीच्या भूमिकेत झळकली होती. मराठी चित्रपट मालिका अभिनेत्री स्वरांगी मराठे दुसऱ्यांदा आई झाली आहे. “अवघा रंग एकचि झाला!” अशा नाटकांमधूनही ती बालभूमिकेत झळकली. पुढे पोर बाजार, गोंदण, बॉलिवूड चित्रपट बाजीराव मस्तानी, स्वराज्यरक्षक संभाजी अशा चित्रपट आणि मालिकेतून स्वरांगीला अभिनयाची संधी मिळाली. बालकलाकार म्हणून नावारूपाला आलेली स्वरांगी उत्कृष्ट गायिका देखील आहे. अनेक मोठमोठ्या कार्यक्रमात ती गाणी देखील गाते. लहानपणी स्वरांगीने गाण्याच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते.

स्वरांगी काही दिवसांपूर्वीच दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिला पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. ‘सोयरा’ हे तिच्या थोरल्या लेकीचं नाव आहे. सोयरा साधारण तीन वर्षांची आहे तर नुकत्याच जन्मलेल्या तिच्या लेकाचं नाव तिने सोशल मीडियावर शेअर केलं आहे. ‘सुहित’ असं तिनं तिच्या मुलाचं नाव ठेवलं आहे. सुहित या नावाचा अर्थ सकारात्मक आणि प्रत्येकाला भावणारा असा आहे. स्वरांगी आणि निखिलने एक फोटो शेअर करून पुत्ररत्न प्राप्तीची गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

त्यामुळे मराठी सेलिब्रिटींनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. स्वरांगी आणि निखिल यांचे लग्न अतिशय साधेपणाने झाले होते. लग्नसोहळ्यात खर्च होणारी रक्कम स्वरांगीच्या वडिलांनी वनवासी आश्रम कल्याण व सांगीतिक संस्थांना दान केली होती. लग्नाअगोदर पाच वर्षे स्वरांगी ठाण्याजवळील येऊर येथील एका आश्रमात मुलांना गाणे शिकवायला जात होती. लग्नाच्या निमित्ताने डेकोरेशन, रिसेप्शन साठी खर्च होणारी अवास्तव रक्कम म्हणजे जवळपास ७ लाख रुपये तिने या आश्रमासाठी दान केले होते.

निखीलच्या कुटुंबीयांनी देखील त्यांच्या या निर्णयाचे स्वागतच केले होते. साधारण सहा ते सात लाख रुपये आम्ही या आश्रमाला दान करू असे स्वरांगीच्या वडिलांनी त्यावेळी म्हटले होते. स्वरांगी सध्या अभिनय क्षेत्रात फारशी सक्रिय नसली तरी आपल्या गाण्याची आवड ती आजही जोपासताना दिसते. मुलीच्या संगोपणानंतर आता दुसऱ्या अपत्याची जबाबदारी तिच्यावर पडली आहे.

मात्र ही जबाबदारी चोख बजावत ती पुन्हा आपल्या आवडत्या क्षेत्रात सक्रिय होईल. स्वरांगीच्या घरातील अनेक मंडळी कलाक्षेत्राशी निगडित आहेत अभिनय असो किंवा वाद्य घरातील सगळेच ह्यात पारंगत आहेत. त्यामुळे स्वरांगी पुन्हा अभिनयाकडे वळण्यासाठी तिला घरून नक्कीच साथ मिळणार यात शंका नाही. स्वरांगिला आणि निखिल काळे यांना पुत्रप्राप्तीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *