“बाॅलीवुडची वादग्रस्त ॲक्र्टैस राखी सावंत आणि तिच्या दोन्ही नवर्याविषयी घ्या जाणुन…..!”

“मुळात ती म्हणजेचं वाद,आणि वादातुनचं जन्मलेलं व्यक्तीमत्व म्हणजेचं ड्रामा क्वीन अभिनेत्री राखी सावंत” ती नेहमीच चर्चेत असते. नुकतीचं राखी सावंत ही पोलीस स्टेशनच्या बाहेर दिसली होती. त्यामुळे राखीच्या आयुष्यात आता काय झाले असा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला आहे. आता राखी सावंतने तिचा पहिला नवरा रितेश याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच राखी सावंतने तक्रार नोंदवल्यानंतर राखीचा पहिला नवरा रितेशनेही सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे राखी तिच्या आयुष्यातील नव्या ड्रामाने ती पुन्हा चर्चेत आली आहे.

राखीचा नवरा आरोप करताना म्हणाला,’राखी सावंत फक्त पैशांसाठी लग्न करते.तिच्याकडे सुरुवातीला एकही गाडी नव्हती, तिला मी गाडी दिली होती’. या आरोपावर राखी सावंतने पहिल्या नवऱ्याला प्रत्युत्तर दिले आहे. यावर राखी सावंत म्हणाली, ‘हे खरं आहे की माझ्याकडे कोणतीच गाडी नव्हती. त्याने मला तेव्हा गाडी दिली होती. परंतु मी त्याला त्याची गाडी पुन्हा केली. कारण त्याने मला ती गाडी परत करण्यासाठी सांगितलं होतं.

आता माझ्याकडे आदिलने भेट दिलेली एक गाडी आहे’. ती पुढे म्हणाली, ‘रितेश हे सगळं खोटं सांगत आहे. त्याने मला जे दागिने दिले होते ते सगळे खोटे होते. जेव्हा मला आईच्या उपचारासाठी पैसे हवे होते. तेव्हा मी ते दागिने घेऊन सोनाराकडे गेली. तेव्हा मला कळलं की हे दागिने कोणते आहेत. तेव्हा मला खूप हसू आलं. मला सांगितलं होतं की, हे सगळे दागिने खरे आहेत. खरंतर चांदीच्या दागिन्यांवर सोन्याचा मुलामा लावलेले दागिने होते.

राखी सावंतने पुढे सांगितलं की, तिने खोट्या दागिन्यांबद्दल रितेशसोबत बोलायला गेली होती. ‘मी त्याला विचारलं, तुला लाज नाही वाटत मला खोटे दागिने द्यायला?’ तेव्हा पहिला नवरा म्हणाला ‘तू याच लायकीची आहेस’. तसेच त्याने मला धक्के मारून घराबाहेर काढले . तसेच मला अशिक्षित म्हणाल्याचे राखीने सांगितले. दरम्यान, राखी सावंतचे पहिल्या नवऱ्याबरोबर शाब्दिक वाद सुरूच आहे. त्यामुळे राखी सांवतने केलेल्या आरोपावर पहिला नवरा रितेश काय उत्तर देणार , याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

राखी सावंतने पुढे सांगितले की, रितेशचे तिला गलिच्छ मेसेज येत आहेत. चुकीच्या गोष्टी लिहिल्या जात आहेत. तर राखीचा प्रियकर आदिल दुर्रानीने सांगितले की, मी सोशल मीडिया अकाउंटवर लॉग इन करण्याचा खूप प्रयत्न केला. बऱ्याचदा प्रयत्न करूनही ती लॉग इन करू शकत नाही. ती यापुढे तिचे गुगल पे किंवा तिचा फोन देखील ऍक्सेस करू शकणार नाही.’

राखी सावंत म्हणाली की, रितेश तिचा फोनही उचलत नाही. माझ्या मेसेजेसला रिप्लाय सुद्धा देत नाही. तो माझ्या सोशल मीडिया अकाऊंटवर घाणेरड्या भाषेत लिहित आहे.’ दरम्यान, बिग बॉसच्या घरामध्ये राखी सावंतने तिचा पूर्वाश्रमीचा पती रितेशसोबत एन्ट्री घेतली होती. त्यांच्यामध्ये सगळं काही सुरळीत सुरु असताना राखीने रितेशपासून वेगळं होण्याचा निर्णय घेत घटस्फोट घेतला.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *