“बाॅलिवुडची सुंदर अभिनेत्री रेखाच्या नवर्याविषयी जाणुन घ्या!”

झगमगत्या चंदेरी दुनियैत म्हणजेचं बॉलिवूडमध्ये बर्‍याच सुंदर अभिनेत्री आल्या आणि गेल्या, पण रेखाच्या सौंदर्याशी कोणीही बरोबरी करू शकलं नाही. वयाच्या ६८’व्या वर्षीही रेखा कोणत्याही अभिनेत्रीला हरवू शकते. रेखाचे वय जसजसे वाढत आहे तसतसे तिचे सौंदर्यही वाढत आहे. रेखा अशी एक अभिनेत्री आहे.जी जसजशी पुढे जात आहे तसतशी ती अधिक सुंदर बनत आहे. रेखावर चित्रीत करण्यात आलेले हे गाणे, ‘इन आंखों की मस्ती के मस्ताने हजारों हैं’ त्यांच्यावर एकदम फिट बसते. त्याचे सौंदर्य प्रेमी केवळ वृद्ध आणि म्हातारेच नसून तरुण देखील आहेत.

एकेकाळी त्यांचे नाव अमिताभ बच्चन यांच्याशी खूप जोडले गेले होते. तिच्या फिल्मी करिअरपेक्षा रेखा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जास्त चर्चेत राहिली. कधी ती अमिताभ बच्चन आणि कधी विनोद मेहरा यांच्यासोबतच्या अफेअरमुळे चर्चेत होती. त्यांच्या भांगेतील कुंकू आजही लोकांसाठी एक रहस्य आहे.१९९० मध्ये रेखाने उद्योगपती मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केले. पण लग्नाच्या काही महिन्यांनंतर रेखा त्यांच्यापासून खूप दूर राहू लागली. रिपोर्ट्सनुसार, रेखा काही महिन्यांतच तिच्या लग्नाला कंटाळली होती आणि तिला मुकेशबरोबर राहायचं नव्हतं. त्यांचे लग्न एक वर्षदेखील टिकले नाही.

मुकेशने रेखाच्या जवळ जाण्याचा खूप प्रयत्न केला पण तो आपला विचार बदलू शकला नाही आणि तो नैराश्यात गेला. लग्नाच्या अवघ्या ७ महिन्यांनंतर १९९१ मध्ये मुकेशने आपले प्राण सोडले. रेखाचे वय ३५ आणि मुकेश ३७ वर्षांचे होते जेव्हा दोघांचे लग्न झाले होते. रेखा आणि मुकेश यांची भेट एका सामान्य मित्राच्या माध्यमातून झाली. मुकेशला पहिल्या भेटीपासूनच रेखावर प्रेम होतं आणि तिच्याशी लग्न करायचं होतं.

त्यांनीच रेखाला प्रपोज केले होते त्यानंतर दोघांचे लग्न झाले होते. लग्नानंतर मुकेशने सांगितले की तीने आपल्या लग्नाबदल फिल्मस्टार मित्रांना सांगावे. परंतु रेखा यावर सहमत नव्हती. तीने केवळ ३ लोकांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली, ज्यात अकबर खान, संजय खान आणि हेमा मालिनी यांची नावे होते. रेखा मुकेशसमवेत हेमा आणि धर्मेंद्रच्या घरी पोहोचली. हेमाने मुकेशकडे काळजीपूर्वक पाहिले आणि म्हणाली, ‘आता असे म्हणू नकोस की तू या माणसाशी लग्न केले आहे’. रेखा म्हणाली, ‘हो आम्ही विवाहित आहोत’. यानंतर हेमाचा प्रश्न होता- ‘तो खूप श्रीमंत आहे’? रेखा यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले नाही.

एकदा टीव्ही मुलाखतीत रेखाने सांगितले की, अमिताभ बच्चन यांना भेटताच ती वेडी झाली होती. पहिल्या भेटीतचं अमिताभतच्या करीष्म्यानी त्यांच्यावर जादू केली. त्यांनी अमिताभसह सुमारे १० चित्रपटांत काम केले. त्यातला ‘सिलसिला’ हा चित्रपट अमिताभ आणि रेखा यांच्या नात्यावर आधारित चित्रपट आहे. त्यावेळी रेखाच्या आणि अमिताभ बच्चन यांच्या अफेअरने बरीच चर्चा झाली होते. यानंतर त्यांचे नाव अभिनेता विनोद मेहरा यांच्याशीही जोडले गेले. अशा बातम्याही आल्या आहेत की दोघांनाही लग्न करायचं होत पण विनोद मेहराच्या आईला हे नातं मान्य नव्हतं आणि यामुळे विनोदने रेखापासून अंतर ठेवलं.
स्वप्नील लव्हे

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *