‘रंग माझा वेगळा’ मधील अभिनेत्रीची बहिणही आहे प्रसिद्ध अभिनेत्री…पहा ती कोण?”

अभिनेत्री हर्षदा खानविलकर हिने ‘आक्कासाहेब’ आणि नंतर ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतून अतिशय हुशार आणि करारी अशी बिझनेस वुमन बनून प्रेक्षकांच मन जिंकलंय. चित्रपटसृष्टी आणि मालिकांमध्ये आतापर्यंत अनेक व्हिलन आपण पाहिले. यातल्याच सुप्रसिद्ध व्हिलन म्हणून अभिनेत्री हर्षदा खानविलकर हिला पाहिलं जातं. ‘रंग माझा वेगळा’ हा मालिकेला सध्या प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळतेय. यातील ‘सौंदर्या इनामदार’ हे पात्र प्रेक्षकांना खूप आवडत आहे. पण हर्षदा खानविलकर ही एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीची बहिण आहे, हे खुप कमी लोकांना माहिती असेल.

स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील सौंदर्या इनादमार म्हणजेच अभिनेत्री हर्षदा खानविलकर ही सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल देशपांडे हिची बहिण आहे. तसंच अभिनेत्री मृणाल देशपांडे ही सुद्धा सुप्रसिद्ध अभिनेत्री समिधा गुरू हिची थोरली बहिण आहे हे देखील खूप कमी लोकांना माहितेय. समिधा गुरू सध्या कलर्स मराठीवरील ‘शुभमंगल ऑनलाइन’ मालिकेत ऐश्वर्या हे पात्र साकारतेय. या दोघीही सख्ख्या बहिणी आहेत.

पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की मृणाल देशपांडे आणि समिधा गुरू या सख्ख्या बहिणी आहेत तर मग हर्षदा खानविलकर कोण? तर हर्षदा खानविलकर मृणाल देशपांडे हिची मानलेली बहिण आहे. काही दिवसांपूर्वीच मृणाल देशपांडे हिने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. यामध्ये ती बहिण हर्षदा खानविलकरसोबत दिसून आली. नुकताच अभिनेत्री हर्षदा खानविलकरचा वाढदिवस साजरा झाला. हर्षदाचा यंदाचा वाढदिवस दोघीं बहिणींनी एकत्र साजरा केला.

या दोघींनी यापूर्वी ‘पुढचं पाऊल’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. या मालिकेच्या दरम्यान हर्षदा आणि मृणाल या दोघींमध्ये अगदी जिव्हाळ्याचे नातं बनत गेलं. हे नातं पुढे इतकं घट्ट होत गेलं की त्याचं रूपांतर मानलेल्या बहिणीच्या नात्यात झालं. अभिनेत्री मृणाल देशपांडे ही मुळची नागपुरची आहे. तर हर्षदा खानविलकर ही मुळची मुंबईचीच आहे. अभिनेत्री मृणाल देशपांडे हिने यापूर्वी ‘अग्निहोत्र’, ‘पुढचं पाऊल’, ‘छत्रीवाली’ सारख्या मराठी मालिका तसंच ‘बावरा दिल’ या हिंदी मालिकेतूनही ती झळकली आहे.

अभिनेत्री मृणाल देशपांडे ही नाट्य निर्माते चंद्रकांत लोकरे यांची पत्नी आहे. त्यांना एक मुलगाही आहे. हर्षदा खानविलकर ही सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव यांची पत्नी आहे. तिला दोन मुली आहेत. हर्षदा खानविलकर हिला सुद्धा मृणाल देशपांडे सारखीच एक सख्खी बहिण आहे. हर्षदा खानविलकर आणि मृणाल देशपांडे या दोघींनाही सख्खी बहिण असुनही दोघींमधलं मानलेल्या बहिणीचं नातं काही वेगळंच दिसून येतं.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *