“यांची मुलगी आहे मोठी अभिनेत्री…!”

अभिनेत्री भूमी पेडणेकरचा बॉलिवूडमधील प्रवास फार रंजक आहे. अभिनेत्रीने इतर लोकांना सिनेमात कास्ट करण्यापासून बॉलिवूडमध्ये काम करण्याची सुरुवात केली होती, त्यांनतर तिने यशराज फिल्मच्या बॅनरखाली सिनेसृष्टीत २०१५ साली आगमन केले. आश्यर्च म्हणजे तिने एवढ्या कमी कारकिर्दीत किती वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्या आहेत.

भूमीने दम लगा के हैशा या सिनेमात वजनदार नववधू साकारली होती. यासाठी चक्क भूमीने ३० किलो वजनही वाढवले होते. आयुष्मान खुरानासह आलेला अभिनेत्रीचा हा सिनेमा हिट ठरला. सिनेमामध्ये चित्रित करण्यात आलेली गाणी देखील एव्हरग्रीन ठरली. नंतरच्या “टाॅयलेट-एक प्रेमकथा” अक्षय कुमार स्टारर या सिनेमात अभिनेत्रीने गावातील एक साधी-सरळ बाई साकारली. जिच्या साड्या अगदीच स्वस्त, नेहमी डोक्यावरून पदर, सिंदूर असा तिचा लूक होता. याशिवाय गाव आणि निमशहरी दोन्ही विचारसरणीची ओळख असणारी तिची भूमिका होती. भूमीच्या या भूमिकेचं विशेष कौतुक झालं.

झोया अख्तरच्या लस्ट स्टोरीजमध्ये अभिनेत्रीने एका मोलकरणीची भूमिका साकारली आहे. यामध्ये तिने अगदी विरलेला पंजाबी ड्रेस आणि नो मेकअप लूक सहज कॅरी केला आहे.अभिषेक चौबेच्या या सिनेमात भूमीसह दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपुत आणि मनोज वाजपेयी मुख्य भूमिकेत आहेत. स्वत:च्या कुटुंबातून पळून गेलेल्या ‘ठाकूर’ स्त्रीची भूमिका भूमीने यात साकारली. चिखलाने माखलेली साडी आणि लांबलचक ब्लाउज असा तिचा लुक होता.

सांड की आँखमध्ये भूमी पेडणेकरने शूटर दादी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या नेमबाज चंद्रो तोमर यांची भूमिका साकारली. तिच्यासह तापसी पन्नू हिने देखील या सिनेमात जबरदस्त भूमिका केली आहे. यात 60 वर्षांच्या आजीचा जी भन्नाट नेमबाज आहे, अशी भूमिका साकारणं नक्कीच आव्हानात्मक होतं. अभिनेत्री भुमी पेडणेकर हिने अलीकडेच ‘दुर्गामती’ सिनेमात काम केले होते. अनुष्का शेट्टीचा तेलुगू सिनेमा ‘बागमती’चा हा हिंदी रिेमेक होता. सिनेमातील भूमीच्या पोस्टरपासून तिच्या लूकची विशेष चर्चा झाली होती. अश्या ह्या बहुगुणी अभिनेत्रीस शुभेच्छा! 😊

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *