“बाॅलीवुडची अप्सरा ऊर्वशी रौतेला चा हा क्रिकेटपटु आहे नवरा”

उर्वशी व रिषभ पंतमध्ये नेमकं काय सुरू आहे? काही दिवसांआधी उर्वशीने रिषभ पंतला जाम डिवचलं होतं. अगदी रिषभ पंतला ‘छोटू भैय्या’ म्हणत तिने त्याची टर उडवली होती. यानंतर रिषभनेही तिला सडेतोड उत्तर दिलं होतं. हा वाद गेल्या काही दिवसांपासून सतत गाजतोय. या वादाची सुरूवात झाली होती ती एका व्हिडीओने.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर उर्वशीच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता आणि यात उर्वशी अप्रत्यक्षपणे रिषभवर बोलली होती. ‘तो मला भेटण्यासाठी १२-१४ तास थांबला होता व त्याने मला ६०+ मिस्ड कॉल दिले होते,’असं उर्वशी म्हणाली होती. उर्वशीच्या या मुलाखतीच्या व्हिडीओवर रिषभने जळजळीत प्रतिक्रिया दिली होती. ‘प्रसिद्धीसाठी काही लोकांना मुलाखतीत खोटं बोलताना पाहून, गंमत वाटतेय…’,असं तो म्हणाला होता. यावर उर्वशी गप्प कशी राहणार होती? तिने यावर प्रत्युत्तर देत रिषभला छोटू भैय्या म्हटलं होतं.

‘छोटू भैया को बैट बॉल खेलना चाहिए. मैं कोई मुन्नी नहीं हूं डार्लिंग बच्चे तेरे लिए बदनाम होने को…,’ असं ती म्हणाली होती.उर्वशी व रिषभ यांच्यातील या शाब्दिक युद्धाची मीडियात खमंग चर्चा रंगली होती. अभिनेत्री ‘उर्वशी रौतेला’ गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. होय, उर्वशी रौतेलाने एखादी पोस्ट केली रे केली की, नेटकरी त्याचा संबंध थेट क्रिकेटपटू रिषभ पंतसोबत जोडतात. तिला ट्रोल करतात.

आता तर उर्वशी रिषभला स्टॉक करत असल्याचा आरोपही होताना दिसतोय. आत्तापर्यंत उर्वशी यावर काहीही बोलली नव्हती. पण आता तिने एक व्हिडीओ शेअर करत, यावर रिअ‍ॅक्ट केलं आहे. “है, तो किस बात का गम हो… !” या व्हिडीओत उर्वशी साडीत अतिशय खिन्न, उदास चेहर्यासह उभी दिसतेय. बॅकग्राऊंडमध्ये एक शायरी ऐकायला मिळतेय.

‘अगर वो पूछ लें हम से कि किस बात का गम है,तो किस बात का गम हो… अगर वो पूछ लें हम से कि किस बात का गम है… अगर वो पूछ लें हम से कि शामों का कहां रहते हो, तो शामों को हम कहां होंगे…अगर वो पूछ लें हम से मलाल ए इश्क कितना है सवालों के गिरह में हूं, जो तुम पूछो तो जवाब दूं, जो न पूछो तो किसी कह दूं… मुनासिब है न कि न मुंह खोलो, न पूछो और न कुछ जानो, पर उस याद का क्या जो जिरह करती है मुझसे गुल ए गुलजार हो तुम, हर हवा का रुख तुम ही तो हो।

अशी ही शायरी आहे. नुकत्याच तिने टाकलेल्या….”माझी कुणालाच पर्वा नाही…!” या व्हिडीओला उर्वशीने कॅप्शन दिलं आहे, त्याने तिने तिच्या भावना व्यक्त करत ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे. कॅप्शनमध्ये ती लिहिते, ‘आधी इराणमध्ये महसा अमीनी आणि आता भारतात माझ्यासोबत… मला स्टॉकर म्हणत बुली केल्या जातंय. कुणालाच माझी पर्वा नाही. मला सपोर्ट करणारं कुणीही नाही. पण एक सक्षम महिला तीच आहे जी खोलवर सगळं सहन करून खूप प्रेम देते. हास्यासोबत तिच्या अश्रूंचाही बांध फुटतो. ती कोमल आहे आणि तितकीच सक्षमही. एक महिला जगासाठी भेट आहे.

’उर्वशीच्या या व्हिडीओवर कमेंट्सचा पूर आला आहे. अनेकांनी या व्हिडीओवरूनही तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. तुला कुणीही बुली करत नाही. तूच सर्वांचं आकर्षित करण्याचा प्रयत्न करते आणि तेच तुला कुठल्याही स्थितीत मिळवायचं असतं, अशी कमेंट एका युजरने केली आहे. रिषभ भावाचा मॅसेज न आल्यामुळे इतकी दु:खी आहे, अशी कमेंट एका युजरने केली आहे. अरे बास्स आता, इतकं दु:खी तुला बघवत नाही, अशा शब्दांत अनेकांनी तिची मजा घेतली आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *