नोरा फातेही चा हा अवतार पाहून घायाळ व्हाल

सन २०१४ मध्ये ‘रोर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिला तेलुगू चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. ”बिग बॉस सिजन ९’ मध्ये झळकल्यावर तिला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. तिने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची जागा निर्माण केली. २०१६ साली ‘झलक दिखला जा’ च्या मंचावर तिने तिची नृत्यामधील खरी प्रतिभा दाखवली.

तसेच,नोरा फक्त नृत्यातच नाही तर मार्शल आर्टस् मध्येही पारंगत आहे. बॉलिवूडची सुंदर आणि मादक अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) तिच्या डान्ससाठी नेहमी चर्चेत असते. शिवाय आपल्या नृत्याने ती नेहमी उत्कृष्ट परफॉरमन्स देते व आपल्या चाहत्यांना खूश करत असते. शिवाय असे विविध ठिकाणी केलेले डान्स ती आपल्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत आपल्या चाहत्यांची वाहवा मिळवत असते. तिची असे डान्स वायरल देखील होत असतात. सध्या तिचा एक समुद्र किनाऱ्यावरील डान्स चांगलाच वायरल होत आहे.

ती या डान्स मधून स्वत: खूप आनंद घेताना दिसत आहे. शिवाय समुद्र किनाऱ्यावरील तिचा मादक डान्स पाहून आपणसुद्धा अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणे ‘समंदर में नहाकर और भी…’ हे गाणे म्हणाल. नोरा फतेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी ती अनेकदा खास फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. आता नोरा फतेहीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर तिचा एक नवा डान्स व्हिडिओ शेअर केला आहे.

तिचा हा व्हिडिओ व्हेकेशनचा आहे, ज्यामध्ये नोरा फतेही समुद्र किनाऱ्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये नोराचे दोन मित्र सुद्धा तिला डान्समध्ये साथ देत आहेत. व्हिडिओमध्ये नोराने लाल रंगाचा बिकिनी टॉप आणि शॉर्ट्समध्ये घातला असून या कपड्यात ती डान्स करता खूपच हॉट दिसत आहे. व्हिडिओमध्ये नोराचा उत्कृष्ट डान्ससोबत तिचा अतिशय ग्लॅमरस लूकसुद्धा पाहायला मिळत आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना तिने खास कॅप्शनही लिहिले आहे. सोशल मीडियावर नोरा फतेहीचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिच्या चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडतो आहे. तिच्या एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिले की, ‘नोरासारखा डान्स कोणीही करू शकत नाही.’ दुसऱ्याने लिहिले, ‘अप्रतिम नृत्य.’ तिसर्‍याने लिहिले, ‘नोरासारखे कोणी नाही.’ याशिवाय इतर अनेक सोशल मीडिया यूजर्सनी नोरा फतेहीच्या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत.

आपल्या नृत्याने इण्डस्ट्रीला वेड लावणारी नोरा वैयक्तिक आयुष्यात सचिन तेंडुलकरची चाहती आहे आणि युवराज सिंहची चांगली मैत्रीण आहे. तिला क्रिकेट खेळात विशेष रुची आहे. नोरा जेव्हा कॅनडाहून भारतात आली होती तेव्हा, तिच्याकडे फक्त ५००० रुपये होते. फिल्म इण्डस्ट्रीमध्ये येण्यासाठी नोराने अनेक संकटांचा सामना केला आहे.

एक मुलाखतीत तिने सांगितलं की, पोट भरण्यासाठी ती कॉफी शॉपमध्येकाम करायची. तिने टेलीकॉलरची नोकरीही केली. या नोकरीत ती लॉटरीची तिकिटे विकत होती. सहा महिने काम करून तिने ती नोकरी सोडली होती. आता नोरा आपल्या आयुष्यात अत्यंत यशस्वी असून तिच्याकडे कामाची काहीच कमी नाहीये. काही दिवसांपूर्वी ती एक डान्स शोमध्ये परीक्षक म्हणूनही दिसली होती. नोराचं ‘छोड देंगे’ हे गाणं युट्यूबवर प्रदर्शित झालं असून ते दोन दिवसात ३२ मिलियन पेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *