“डिंपल कपाडिया चा नवरा कोण आहे? शेवटपर्यंत दोघे घटस्फोट न घेता वेगळे का राहिले?”

“ए पुष्पा,आय हेट टिअर्स!” या डायलाॅगचे बादशहा राजेश खन्ना यांना फिल्म इंडस्ट्रीचे पहिले सुपरस्टार म्हटले जाते. राजेश खन्ना, ज्यांना प्रेमाने ‘काका’देखील म्हटले जाते, एकेकाळी चाहत्यांमध्ये त्यांची ओढ होती. राजेश खन्ना जेवढे त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत आले तेवढेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यानेही चर्चेत आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यावेळी लोकांमध्ये राजेश खन्ना यांची क्रेझ शिगेला पोहचली होती.

मात्र, काकांचे हृदय त्यांच्यापेक्षा १६ वर्षांनी लहान असलेली अभिनेत्री डिंपल कपाडिया हिच्यासाठी धडकले. डिंपलचा पहिला चित्रपट ‘बॉबी’ रिलीज होताच सुपरहिट झाला होता आणि त्याच दरम्यान चाहत्यांना समजले की डिंपलचे लग्न सुपरस्टार राजेश खन्नासोबत होणार आहे. ०८ जून १९५७ रोजी मुंबईमध्ये जन्मलेल्या डिंपल यांनी बालपणापासूनचं अभिनेत्री व्हायचं स्वप्न पाहिलं होतं.

त्यांनी वयाच्या १६ व्या वर्षी निर्माता राज कपूर यांच्या ‘बॉबी’ (१९७३) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्याच वर्षी त्यांनी वयाने स्वतःपेक्षा १५ वर्षांनी मोठ्या असलेल्या राजेश खन्ना यांच्याशी लग्न केलं आणि चित्रपटसृष्टीतून ब्रेकही घेतला. डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना यांची पहिली भेट डिंपल यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण करायच्या अगोदरच झाली होती. दोघंही अहमदाबादच्या एका स्पोर्ट्स क्लबमध्ये पहिल्यांदा भेटले होते. हिमांशू भाई व्यास यांनी दिलेल्या माहितीनुसार ७० च्या दशकात राजेश खन्ना नवरंगपुरा स्पोर्ट्स क्लबमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आले होते.

त्यावेळी राजेश यांना डिंपल आवडल्या होत्या आणि तिथेच दोघांच्या लव्ह स्टोरीची सुरुवात झाली. बातम्यांनुसार, राजेश खन्ना चांदण्या रात्री डिंपलला समुद्रकिनारी घेऊन गेले आणि येथे त्यांनी अभिनेत्रीला आपल्या मनाची गोष्ट सांगितली. डिंपल ही राजेश खन्ना यांना नकार देऊ शकली नाही; कारण डिंपलदेखील काकांची मोठी फॅन होती, डिंपलदेखील तिच्या शाळेच्या दिवसात राजेश खन्नाचे चित्रपट पाहायची.अशा परिस्थितीत राजेश खन्ना यांनी डिंपलला लग्नासाठी प्रपोज करताच अभिनेत्रीला नकार देता आला नाही.

राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांनी १९७३ साली लग्न केलं. त्यावेळी राजेश खन्ना डिंपल यांच्यापेक्षा १५ वर्षांनी मोठे होते. लग्नानंतर जवळपास ११ वर्ष डिंपल कोणत्याही चित्रपटात दिसल्या नाहीत. त्यांनी मोठ्या पडद्यावरून ब्रेक घेतला. दरम्यानच्या काळात “ट्विंकल आणि रिंकी” यांचा जन्म झाला. डिंपल यांना चित्रपटात काम करायचं होतं मात्र राजेश खन्ना यांचा याला विरोध होता. याच कारणाने काही काळानंतर राजेश आणि डिंपल यांच्या वाद होऊ लागले आणि लग्नानंतर ९ वर्षांनी दोघं विभक्त झाले.

डिंपल कपाडिया राजेश खन्ना यांना सोडून आपल्या वडिलांच्या घरी राहू लागल्या. पती राजेश खन्ना यांच्यापासून वेगळं झाल्यानंतर २ वर्षांनी ‘सागर’ चित्रपटातून डिंपल यांनी चित्रपटसृष्टीत पुनरागमन केलं. त्यानंतर त्या बऱ्याच चित्रपटांमध्ये दिसल्या. जेव्हा डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना वेगवेगळे राहू लागले आणि डिंपल यांनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन केलं तेव्हा त्यांची सनी देओलशी जवळीक वाढल्याच्या चर्चा बी-टाऊनमध्ये सुरू झाल्या होत्या. दोघंही ११ वर्षं एकमेकांसोबत होते.

डिंपल यांना सनी देओलशी लग्न करायचं होतं पण तो विवाहित होता. आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन डिंपल यांच्याशी लग्न करायला तो तयार नव्हता. त्यामुळे तब्बल २७ वर्षं राजेश खन्ना यांच्यापासून वेगळं राहूनही डिंपल यांनी त्यांना घटस्फोट दिला नाही असं बोललं जातं. राजेश खन्नाच्या निधनाआधी अखेरचा काळ डिंपल त्यांच्यासोबत होत्या. १८ जुलै २०१२ रोजी राजेश खन्ना यांनी अखेरचा श्वास घेतला.
स्वप्नील लव्हे

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *