“लाडक्या शेवंताचा खरा नवरा पाहिलातं?”

काही वर्षांपूर्वी झी टीव्ही हे चॅनल सुरू झाले होते. त्यावेळेस केवळ झी टीव्ही हेच होते. त्यानंतर अनेक टीव्ही चॅनल सुरू झाली आणि प्रादेशिक भाषांची गरज ओळखून प्रादेशिक भाषांमध्ये देखील झीने चॅनल सुरू केले. त्यानंतर या चैनल वर वेगवेगळ्या मालिका सुरू झाल्या. याप्रमाणे हॉरर मालिका का असू नये असे वाटून झी हॉरर शो झी टीव्हीवर सुरू करण्यात आला होता. त्यानंतर प्रादेशिक वाहिन्यावर देखील आशा मालिका सुरू करण्यात आल्या. त्यानंतर झी मराठीवर देखील अशा मालिका सुरू करण्यात आल्या.

साधारण सात ते आठ वर्षांपूर्वी ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका सुरू झाली. ही मालिका पहिल्या भागात प्रचंड गाजली आहे. त्यानंतर या मालिकेचा दुसरा भाग देखील चित्रित करण्यात आला होता. मात्र, मालिकेच्या तिसऱ्या भागासाठी अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. कारण की गेल्या दोन वर्षापासून जगासह देशभरामध्ये कोरोना महामारीने प्रचंड थैमान घातले आहे. या मालिकेमध्ये शेवंता आणि अण्णा नाईक यांची जोडी प्रेक्षकांना ही प्रचंड आवडत आहे.

अण्णा नाईक ही भूमिका प्रसिद्ध अभिनेते माधव अभ्यंकर यांनी साकारलेली आहे. माधव अभ्यंकर यांनी आजवर अनेक मालिका व चित्रपटात देखील काम केले आहे. आम्ही आज आपल्याला या मालिकेतील शेवंता बद्दल माहिती देणार आहोत. शेवंता ही भूमिका अपूर्वा नेमळेकर हिने साकारलेली आहे. तिने ‘आभास हा’ या मालिकेतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. तिचा जन्म २७ डिसेंबर १९८८ दादर येथे झा ला आहे.

दादर येथे तिने रुपारेल कॉलेज येथून बी ए एम एस मध्ये पदवी मिळवलेली आहे. यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. त्यानंतर तिने अनेक मालिका व चित्रपटातून देखील काम केलेले आहे. तिला व्यावसायिक रंगभूमीवर देखील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मालिकांमध्ये प्रत्येक चॅनलवर तिने भूमिका केलेल्या आहेत. काही वर्षांपूर्वी अपूर्वा हिने युवा सेने चा पदाधिकारी रोहन देशपांडे यांच्यासोबत लगीन गाठ बांधली होती.

मात्र, गेल्या काही वर्षांपासून हे वेगळे राहत असल्याची देखील चर्चा आहे. मात्र, याबाबत अजूनही काही खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे अपूर्वा सध्या कुणा सोबत राहते, याचे उत्तर तीच देऊ शकते. आपल्याला अपूर्वा नेमळेकर आवडते का? हे आम्हाला नक्की सांगा आणि तिने कुठल्या मालिकेतील काम केलेली भूमिका आपल्याला आवडते हे देखील सांगा.
स्वप्नील लव्हे

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *