“प्रिती झिंटाचा नवरा आहे तरी कोण? कसा दिसतो?”

मॉडेलींग आणि जाहिरातींच्या चित्रीकरणानंतर प्रीतीने मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. प्रीती झिंटा हि बॉलिवूड मधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक अभिनेत्री आहे. प्रितीची गणना बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत केली जाते.
आजवर बॉलिवूडमध्ये प्रीती झिंटानं अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. मात्र, प्रिती गेल्या काही काळापासून चित्रपटांपासून दूर आहे. पण आयपीएलच्या सीजनमध्ये ती भारतातच असते.

चोरी चोरी चुपके चुपके या या सिनेमासाठी छोटा शकीलचा काळा पैसा वापरल्याचे सिद्ध झाले होते. तसेच या सिनेमाचा निर्माता नसीम रिजवी हा छोटा शकीलचा हस्तक असल्याचे सिद्ध झाल्याने एकच खळबळ उडाली होती.या खटल्याचा संबंध थेट बॉलीवुडशी असल्याने हा खटला खुप गाजला होता. बॉलीवुड आणि अंडरवर्ल्ड चे लागेबांधे या खटल्यामुळे सर्वांसमोर आले होते.

भारत शाह हे एक इंडस्ट्री मधलं मोठं नाव होतं. बॉलीवुड मधला एक मोठा फायनांसर म्हणून परिचित असलेला भरत शाह पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याने सर्वांची कुंडली एकप्रकारे बाहेर आली.खटल्यात बॉलीवुड मधील नामचीन अश्या १३ व्यक्तींनी साक्षी दिल्या होत्या. त्यात सलमान ख़ान, शाहरुख़ ख़ान, राकेश रोशन, महेश मांजरेकर, अली मोरानी, संजय गुप्ता, निर्माता हरीश सुघंद, रतन जैन आणि मोहम्मद मोरानी आदींचा समावेश होता. खटल्याचा थेट अंडरवर्ल्डशी संबंध असल्याने यातील सर्वच्या सर्व जणांनी आपली साक्ष कोर्टात फिरवली होती.

त्यावेळी अख्ख्या बॉलीवुड मधून एकच रणरागिणी आपल्या साक्षीवर अटळ अडिग ठाम राहिली, ती म्हणजे प्रीटी झिंटा. प्रीती झिंटाच्या कुटुंबाचा इतिहास बघितला असता तिच्या शौर्याचे रहस्य त्यातून समोर आले आहे. सन-१७६१ रोजी झालेल्या पानीपतच्या महासंग्रामानंतर अनेक मराठा कुटुंबे पानीपतच्या परिसरातच स्थायिक झाली. पानिपत, कुरुक्षेत्र, कर्नाल, जिंद या निवडक जिल्ह्यांत ती राहतात.

अनेक पिढ्या उलटल्या तरी आपण मूळचे मराठी आहोत, याचे त्यांना कधीही विस्मरण झाले नाही. त्यांची आडनावेही भोसले, चोपडे, झाकले, चौधरी, राणे, इंगोले अशी आहेत. कोल्हापूरचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. वसंतराव मोरे यांच्या निरीक्षणानुसार, त्यांची संख्या तब्बल सात लाख आहे.प्रिती झिंटाचे कुटुंब हे देखील यापैकीच एक असून ती मराठा वीरांगणा आहे. तसेच त्यांचे मुळ आडनाव हे रत्नागिरी जिल्ह्यातील झांटे आहे. पानिपतच्या शूरवीरांचा वारसा अभिनेत्री प्रीती झिंटाला लाभलेला आहे.

अश्या शुरवीर प्रीतीचे खाजगी आयुष्य वादातीत राहिलयं. नेस वाडिया सोबतचा तिचा संसार पाचचं वर्षो चालला. नंतर२०१५ मध्ये मुळच्या अमेरिकन असलेल्या जीन गुडईनफशी तिने लग्नगाठ बांधली. वयाच्या ४६व्या वर्षी त्यांना सरोगसीद्वारे दोन मुलं झालीयेत. एकाचे नाव “जय” तर मुलीचे नाव “जिया” आहे. जीन हे एका प्रतिथयश हारड्रोईलेक्र्टीसीटी प्रोजेक्ट कंपनीत VP पदावर कार्यरत आहेत. ह्या जोडप्यास वैवाहिक जिवनासाठी शुभेच्छा!!! 😊
स्वप्नील लव्हे

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *