“ता ईसरालयंऽऽऽ…. म्हणणारा पांडु आता बघा काय करतो!”

“रात्रीस खेळ चाले” या मालिकेच्या दोन्ही सिझनमध्ये आपल्याला पांडूची भूमिका पाहायला मिळत आहे. हा पांडू खुळा असून प्रत्येक गोष्ट विसरतो आणि इसरलो… असे म्हणत त्याची प्रांजळ कबुली देखील देतो. त्यामुळे हा भोळा पांडू प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. रात्रीस खेळ चाले या मालिकेत पांडूची भूमिका प्रल्हाद कुडतडकरने साकारली आहे. आता प्रेक्षकांचा हा लाडका पांडू कॉमेडी करणार आहे. थक्क झालात ना? पण हे खरं आहे.

“कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे….असं म्हणत गेली चार वर्षं झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाचं शेलिब्रिटी हे नवीन पर्व नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या पर्वात प्रेक्षकांचे लाडके कलाकार कॉमेडी करत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरत आहेत. या पर्वात आता पांडू म्हणजेच अभिनेता प्रल्हाद कुरतडकरची एंट्री होणार आहे. पांडू ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडत आहे.

पण प्रल्हाद चला हवा येऊ द्याच्या मंचावर कॉमेडी करून प्रेक्षकांचे मन जिंकतो हा हे लवकरच कळेल. प्रल्हादच्या कॉमेडीची झलक प्रेक्षकांना ‘चला हवा येऊ द्या’च्या आगामी भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. रात्रीस खेळ चाले या मालिकेला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. या मालिकेतील अण्णा, शेवंता, दत्ता, सविता, काशी, वच्छी, पांडू या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या मालिकेत काशीचा मृत्यू झाल्यानंतर आता पुढे काय होणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली.

या मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले असून या मालिकेला टिआरपी देखील खूपच चांगला आहे.
रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या पहिल्या सिझनला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. अण्णांच्या घरात खरंच भूत आहे की कोणी घरातील सगळ्यांना उगाचच घाबरवत आहे हे गूढ मालिकेच्या शेवटच्या भागापर्यंत टिकून होते. या मालिकेतील काही कलाकार सध्या रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या सर्व सिझनमध्ये देखील प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत.
स्वप्नील लव्हे

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *