“रात्रीस खेळ चाले मधील सुष्मा ऊर्फ सुशल्या….!”

झीटीव्ही मराठीच्या गाजलेल्या पहिल्या मराठी हाॅरर शो म्हणजेचं छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘रात्रीस खेळ चाले’ मधून आपल्या अभिनयाने लोकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री “ऋतुजा धर्माधिकारी” हीने रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. या अभिनेत्रीने मालिकेतून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले आहे. त्याचबरोबर पहिल्यांदाच एखाद्या मालिकेत काम करुन रसिकांच्या मनात घर करणे सोपे नाही. मात्र, हीने ते करुन दाखविले आहे.

अल्पावधीतचं सेलीब्रेटी झालेली ॠतुजा बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातदेखील सहभागी झाली होती. मात्र, टास्क दरम्यान तिला दुखापत झाल्यामुळे शो अर्धवट सोडावा लागला. आणि नंतर ती कोणत्याच मालिकेत काम करताना दिसली नाही. तिने कामाला ब्रेक दिलेला. ऋतुजा मालिकेत काम करत नसली तरी ती सोशल मीडियावर खूपचं ॲक्टिव्ह असते.

ती सोशल मीडियावर तिचे सुंदर फोटो शेअर करत असते. तिचे फोटो पाहून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल. मालिकेतील सुशल्याची भूमिका साकारणारी ऋजुता प्रत्यक्ष खुपच सुंदर दिसते. ऋतुजाबद्दल बोलायचे म्हणले तर ती मुळची औरंगाबादची आहे. तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्याचबरोबर तिला डान्सही करायला आवडत होते. बारावीनंतर शिक्षणात लक्ष न देता तिने अभिनय क्षेत्रात काम करण्याचे ठरविले आणि तिथूनच तिच्या संघर्षाला सुरुवात झाली.

ऋतुजाने पुण्यामध्ये ‘एमएइन ड्रामा’ साठी प्रवेश घेतला. त्यावेळी तिला ऑडीशनसाठी मुंबईला यावे लागले. तिला ऑडिशनसाठी मुंबईला येऊन पुन्हा पुण्यात यावे लागत होते. यानंतर तिचा “पुणे-मुंबई-पुणे” असा प्रवास सुरु झाला. त्यानंतर तिला ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि मालिकेमधूनच तिने साकारलेल्या भूमिकेच्या नावाने लोक तिला ओळखू लागले.😊
स्वप्नील लव्हे

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *