“माई म्हणजेच शकुंतला नरे ह्या फोटोत बघुन आश्चर्यचकित व्हाल!”

रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या सगळ्याचं सिझन्सला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळाले आहे. या मालिकेतील अण्णा, शेवंता, दत्ता, सविता, काशी, वच्छी, पांडू या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या. रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या पहिल्या सिझनला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. अण्णांच्या घरात खरंच भूत आहे की कोणी घरातील सगळ्यांना उगाचच घाबरवत आहे हे गूढ मालिकेच्या शेवटच्या भागापर्यंत टिकून होते.

या मालिकेतील काही कलाकार सध्या रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या दुसऱ्या सिझनमध्ये देखील प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या दोन्ही सिझनमध्ये आपल्याला माई महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळतायेत. या मालिकेतील या प्रेमळ माई प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेत माईची भूमिका शकुंतला नरे साकारत असून या मालिकेत त्या अण्णांच्या पत्नीच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत.

शकुंतला नरे या मालिकेत नेहमीच आपल्याला नऊवारी साड्यांमध्ये पाहायला मिळतात. पण तुम्हाला माहीतेय का, खऱ्या आयुष्यात त्या खूपच वेगळ्या आहेत. त्या अनेक वेळा पाश्चिमात्य कपडे घालतात. त्यांचे खऱ्या आयुष्यातील फोटो पाहिल्यानंतर रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत माईची भूमिका साकारणाऱ्या याच आहेत का असा प्रश्न नक्कीच पडतो.

शकुंतला नरे या मालिकेत अतिशय छोट्या गावातील दाखवण्यात आल्या असल्या तरी त्या खऱ्या आयुष्यात खूपच वेगळ्या असल्याचे या फोटोतून आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांना पाश्चिमात्य कपड्यांत पाहून त्यांच्या फॅन्सना नक्कीच आश्चर्याचा धक्का बसतो. पण त्यांचे हे रूप त्यांच्या फॅन्सना आवडत असल्याचे देखील ते कमेंटच्या माध्यमातून सांगतात. त्यांना सोशल मीडियावर त्यांचे फॅन्स मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात.
स्वप्नील लव्हे

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *