“अण्णांची खरी बायको आहे सगळ्या मराठी नटींहुन सुंदर….पहाचं!”

झी टीव्ही मराठीची पहिली हाॅरर मालिका ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिकने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील अण्णा आणि शेवंता या पात्रांना भरभरून प्रेम मिळत आहे. शेवांताच्या अदांनी फक्त अण्णाच नाही तर प्रेक्षकही पुरतेचं घायाळ झाले आहे. सर्वांच्या मनात धाक आणि भीती निर्माण करणारी अण्णा नाईक ही भूमिका माधव अभ्यंकर हे साकारताना दिसतात तर शेवंता ही भूमिका अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने साकारली. या दोन्ही पात्रांना घेऊन सोशल मिडीयावर अनेक मिम्स आपल्याला पाहायला मिळतात.

अण्णा नाईक म्हणजे माधव अभ्यंकर मुळचे पुण्याचे असून त्यांनी या मालिकेतील पत्रासाठी कोकणी भाषा शिकली. ही भाषा आत्मसात करण्यासाठी त्यांना खूप परिश्रम करावे लागले. या मालिकेसाठी माधव अभ्यंकर यांनी ७ ते ८ किलो वजन देखील कमी केल. मालिकेत शेवंतावर जीव ओवाळून टाकणारे अण्णा नाईक माधव यांनी खऱ्या आयुष्यातील पत्नीही फार सुंदर आहे. त्यांच्या पत्नीचे नाव रेखा अभ्यंकर आहे. ते त्यांच्या पत्नीसोबात्चे अनेक फोटो सोशल मिडीयावर शेअर करत असतात. बऱ्याच वेळा त्यांच्या पत्नी रेखा त्यांच्या सोबत सेटवर जाताना पाहायला मिळतात.

लॉकडाऊनच्या काळात त्यांनी आपल्या पत्नीसोबत आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवलेला दिसतो. त्यांनी गावाकडचे आणि बाहेर फिरायला गेलेले अनेक फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहे. त्यावर त्यांच्या चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केलेला पाहायला मिळतोय. माधव अभ्यंकर यांनी विश्वविनायक, गंध मातीचा, टाईम प्लीज, तुकाराम, बावरे प्रेम हे, हैप्पी जर्नी,भिकारी, अश्या अनेक चित्रपटात काम केले आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील त्यांच्या कामाचे चाहत्यांनी भरभरून कौतुक केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि यापुढेही ते प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करतील अशी आशा आहे.
स्वप्नील लव्हे

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *