“मोहनीश बहलची बायको पहा किती सुंदर दिसते?”

सन-१९९१ मध्ये गाजलेल्या सलमान खान व संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांची मुख्य भूमिका असलेला साजन या चित्रपटातील सगळीच गाणी रसिकांनी डोक्यावर घेतली होती. या चित्रपटात सलमानसोबत आपल्याला एकता सोहोनीला पाहायला मिळाले होते. एकताने आदित्य पांचोली, आमिर खान यांच्यासोबत देखील चित्रपटात काम केले होते. तिने काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमधील प्रसिद्ध नायकासोबत लग्न केले असून त्यांच्या मुलीने बॉलिवूडमध्ये २०१९ मध्ये पदार्पण केले आहे.

एकताचे खरे नाव आरती होते. पण, अभिनेते देवानंद यांच्या सांगण्यावरून तिने आपले नाव बदलून एकता ठेवले. तर ही एकता सोहोनी अभिनेता मोहनीश बहलची पत्नी असून तिने वास्तव या चित्रपटात काम केले आहे. तसेच संजीवनी २ मध्ये देखील मोहनिश आणि एकता झळकले होते. मोहोनिश आणि एकता यांच्या लग्नाला अनेक वर्षं झाले आहेत. त्यांचे लग्न धुमधडाक्यात झाले होते. सलमान आणि मोहनिश खूप चांगले फ्रेंड्स आहेत. मोहनिशच्या लग्नात सलमानने त्याची त्यावेळेची प्रेयसी संगीता बिजलानीसोबत हजेरी लावली होती.

एकताने “सोलाह सतरा” या चित्रपटाद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली. तिला खरी लोकप्रियता अव्वल नंबर या चित्रपटामुळे मिळाली. एकताने वंश, तहलका, नामचीन, वास्तव, लाईफ हो तो ऐसी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ह्या जोडीस दोन मुली असून त्यांची मोठी मुलगी प्रत्युननला सलमान खानने गेल्या वर्षी नोटबुक या चित्रपटाद्वारे लाँच केले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळालेली होती. अश्या ह्या बहुगुणी कलाकार जोडप्यास पुढील मनोरंजनासाठी शुभेच्छा!!!
स्वप्नील लव्हे

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *