“झपाटलेला मधील #चंपाबाई बघा आता किती सुंदर दिसते!”

“खबरदारऽऽऽपत्र नव्हे शस्त्र!”
संपादकाच्या भुमिकेतील हे पात्र तितक्याचं ताकदीने साकारणारी अभिनेत्री म्हणजे एकेकाळी महेश कोठारेंच्या चित्रपटातील “चंपाबाई” आपली लाडकी हास्यअभिनेत्री विशाखा सुभेदार! एकेकाळी नाट्यसृष्टी गाजवणार्या विशाखाने छोट्या पडद्यावर येत धमाल काॅमेडी शो “फु बाई फु” आणि नंतर “काॅमेडीची बुलेट ट्रेन” ने महाराष्र्टाच्या घराघरात हास्याचे कारंजे फुलवले. अवघे १५मिनिटांचे ते स्किट पण बराच काळ विशाखा पब्लिकच्या स्मरणात राहिली कारण सहकलाकारासोबतचे तिचे ट्युनिंग,जुळुन क्षालेली केमिस्र्टी आणि विनोदाचे अचुक टायमिंग!

आपल्या शरीरयष्टीने आत्मविश्वास कधीही ढळु न देता ऊलट तिलाचं आपली ढाल बनवत विशाखा मनोरंजन विश्वाच्या एकेक पायर्या चढतचं राहिली. “गोंद्या मारतयं तंगडं” “खबरदार” “येड्यांची जत्रा” “हरीश्चंद्राची फॅक्टरी” “बीपी-बालक पालक” “सासुबाई गेल्या चोरीला” “बालगंधर्व” आणि “झपाटलेला भाग १ व भाग २” हे तिचे चित्रपट भरपुर गाजले. प्रत्येक चित्रपटातील तिचा रोल छोटा असो कि मोठा कायम लक्षात राहिला. विशाखा पुढेही मराठी मालिका आणि चित्रपटक्षेत्रात कार्यरत राहिली व आजही आहेचं!

२२जून १९७४ला तिचा जन्म मायानगरी मुंबईत झाला. मनोरंजन क्षेत्रात स्थिरस्थावर झाल्यावर विशाखाने १९९८ साली महेश सुभेदार ह्या इंजिनीअर,डबींग आर्टिस्ट व कलाकार अवलियाशी विवाह केला. “श्यामची मम्मी” “जाऊ बाई जोरात” “एक डाव भटाचा”” “भटाची बायपास” “शांतेचं कार्ट चालु आहे….!” ही नाटके प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली. सर्व प्रकारच्या भुमिका निभावलेल्या विशाखाला पब्लिकने विशेष पसंत केले ते विनोदी भुमिकेतचं! नुकत्याचं गाजलेल्या झीटीव्ही मराठीवरील “हास्यजत्रा” या विनोदी मालिकेतुन तिने एक्झिट घेत पब्लिकला आश्चर्यचकित केले. पण यानंतर आलेल्या तिच्या स्पष्टीकरणात ती म्हणते “गेली १०-१२ वर्ष त्या १५मिनिटांच्या स्किटच्या भुमिकेने मला आयुष्यात खुप काही दिले.

मी सतत ह्यास न्याय देत आपले सर्वस्व झोकुन देत सहकलाकारासोबत मिळुन हे स्किट ऊत्तमोत्तम सादर केले त्यासाठी त्याचा अभ्यास व लागणारे सर्व स्किल्स शिकत गेले. मी चालले ते पुढील आलेल्या पीढीला संधी देण्यासाठीचं! माझ्या ह्या प्रवासात सचिन मोटे आणी सचिन गोस्वामी ह्यांचे खुप योगदान आहे. मी आता पुढील काळात एक व्यक्तीरेखा जगेन तिला न्याय देईन ५००-१००० एपीसोड करताना सर्व प्रकारच्या भावभावनांचा विचार करत ती भुमिका सर्वार्थाने जगेन! येते लोभ असावा!” अश्या ह्या गुणी अभिनेत्रीस मनोरंजन विश्वातील भावी कार्यासाठी आमच्याही टीमकडुन शुभेच्छा!
स्वप्नील लव्हे

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *