“पंढरीची वारी” मधील हा बालकलाकार कोण होता?

१९८८ला आलेल्या “पंढरीची वारी” या चित्रपटामुळे थेटर हाऊसफुल झाले होते. आजही हा चित्रपट आणि त्यातील धरिला पंढरीचा चोर हे गाण तितक्याच आपुलकीने आणि आत्मीयतेने पाहिला आणि ऐकले जाते. जयश्री गडकर, बाळ धुरी, नंदिनी, राघवेंद्र काडकोळ, राजा गोसावी, अशोक सराफ(खलनायकी भुमिका) अशा अनेक नामवंत कलाकारांनी चित्रपटात महत्वाच्या भूमिका बजावल्या. चित्रपटाची निर्मिती अण्णासाहेब घाटगे यांनी केली होती आणि याचे संवाद लेखन आणि दिग्दर्शन होते रमाकांत कवठेकर यांचे.

चित्रपटात पंढरीच्या वारीला जाताना जयश्री गडकर यांच्या कुटुंबाला वाटेतच एक चिमुकला भेटतो आणि येणाऱ्या अडचणींना दूर करत तो या कुटुंबाला सांभाळत रहातो. चित्रपटात हा चिमुकला मुका दाखवलेला असल्यामुळे कुठलाही संवाद न साधताच तो आपल्या निरागस अभिनयाने साऱ्यांची मने कशी जिंकून घेतो याचे हे सुंदर कथानक चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडले आहे. मुकाभिनय करून केवळ हावभावाद्वारे अभिनय साकारणे हे खरं तर मोठे आव्हानाचे काम परंतु त्याने ते अतिशय उत्तमरीत्या साकारलेले पाहायला मिळाले होते.

साक्षात विठोबाचे रूप साकारणारा हा चिमुकला चित्रपटाच्या शेवटच्या क्षणी साऱ्यांच्याच डोळ्यात पाणी आणण्यास भाग पाडतो असे हे सुंदर कथानक या सर्वच जाणत्या कलाकारांनी आपापल्या भूमिकेतून अतिशय सुरेखपणे दर्शवलेले पाहायला मिळाले. चित्रपटात विठोबा साकारणारा हा बालकलाकार आहे “बकुळ कवठेकर”. हा बालकलाकार याच चित्रपटाचे दिवंगत दिग्दर्शक रमाकांत कवठेकर यांचा मुलगा होय. या चित्रपटानंतर मात्र तो फारसा कोणत्या चित्रपटात पाहायला मिळाला नाही. पुढे त्याने पुण्यातील भारती विद्यापीठातून फाईन आर्टस् चे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश मिळवला.

मात्र आपले शिक्षण सुरु असतानाच २००२ साली बकुळचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. आणि हा कलाकार आपण खूप आधीच गमावला याचे दुःख तुम्हा-आम्हा सर्वांनाच कायम राहणार. त्याचा भाऊ “समीर कवठेकर” हे एक निर्माते म्हणून याच क्षेत्रात कार्यरत आहेत. “बकुळ फिल्म्स” नावाने त्यांनी स्वतःची निर्मिती संस्था सुरू केली आहे.

स्वराज्यरक्षक संभाजी”, ” स्वराज्यजननी जिजामाता”, राजा शिवछत्रपती” या मालिका तसेच “अजिंठा”, “बालगंधर्व” या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता म्हणूनही त्यांनी आपली भूमिका बजावली आहे. खाकी, मंगल पांडे या बॉलिवूड चित्रपटासाठीही त्यांनी काम केले आहे. “बकुलळ कवठेकर” ह्या बालकलाकाराने ह्या चित्रपटात ज्या पध्दतीने ऊत्कृष्ट काम केले आहे ते पाहताना आजही साक्षात विठ्ठलाचे दर्शन व अनुभुती मिळते. ह्या भुमिकेने बकुळ विठ्ठलरुपात सदैव स्मरणात राहिन.
स्वप्नील लव्हे

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *