“पंढरीची वारी चित्रपटातील नायिका पहा आजही कशी दिसते?”

अवघ्या महाराष्र्टाचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपुरच्या विठ्ठलावर आलेला १९८८ सालचा पंढरीची वारी चित्रपट…..त्यातील “धरिला पंढरीचा चोर…” हे गाणं चित्रित झालं होतं अभिनेत्री नंदिनी जोग आणि बकुळ कवठेकर या कलाकारांवर. अगोदरील लेखात आपण वाचलेले आहेचं कि “बकुळ कवठेकर” हा कलाकार आज आपल्यात नाही. व ह्या गोष्टीनेआपल्या सगळ्यांना खरेचं आश्यर्याचा जबरदस्त धक्का बसलेला.

खरं तर या कलाकाराला जाऊन अठरा वर्षे उलटली परंतु त्याने साकारलेला चित्रपटातील विठुराया साऱ्यांच्याच सदैव लक्षात राहणार एवढे मात्र खरे आणि तशाच स्वरूपाच्या प्रतिक्रियाही अनेकांनी दिल्या. आजच्या लेखात आपण चित्रपटातील ‘नंदिनी जोग’ या अभिनेत्रीबद्दल अधिक जाणून घेणार आहोत… नंदितांनी ह्या चित्रपटात विठ्ठलभक्त वारकरी जयश्री गडकर आणि बाळ धुरी यांच्या मुलीची म्हणजेच ‘मुक्ताची’ भुमिका साकारली होती.

अभिनेत्री नंदिनी जोग या मराठी चित्रपट सृष्टीतील सहाय्यक अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. पंढरीची वारी या चित्रपटाव्यतिरिक्त त्यांनी कळत नकळत, वाजवू का, थांब थांब जाऊ नको लांब, दे धडक बेधकडक अशा चित्रपटातून सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या आहेत. अशोक सराफ, विजय कदम अशा आघाडीच्या कलाकारांसोबत मराठी पडदा गाजवण्याची त्यांना संधी मिळाली.

नंदिनी जोग या मूळच्या अकोल्याच्या! परंतु, लग्न करून पुण्यातच त्या स्थायिक झाल्या आहेत. जाहिरात क्षेत्रात कार्यरत असलेल्या अभिजित जोग यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. अभिजित जोग यांनी पुण्यात “प्रतिसाद ॲडर्व्हटायझिंग” नावाने एजन्सी उभारली आहे व गेल्या अनेक वर्षांपासून ते ॲडर्व्हटायझिंग तसेच ब्रँडिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. याच क्षेत्राशी निगडित असलेले “ब्रँडनामा” या पुस्तकाचे लेखनही त्यांनी केले आहे. ह्या जोडीचा मुलगा ‘अनिश जोग’ हाही मराठी चित्रपट क्षेत्रातचं आहे.
स्वप्नील लव्हे

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *