“झपाटलेला मधील आवडी पहा आता किती सुंदर दिसते?”

“ॐ भग्नी भागोदरी भगभुगै, भगमासे भग्नीयोनी ॐ फट स्वाहाः”
हा विचित्र मंत्राचा भेदरवणारा आवाज आणि बाहुल्याची ती काया….. व लक्ष्याचे “आवडे आवडै….महेशऽऽऽ!” चित्रपटास भयपट बणवण्यात व प्रेक्षकांना खिळवुन ठेवण्यात यशस्वी झालेले. झपाटलेला चित्रपटाने यशाची किती शिखरे पादाक्रांत केली हे वर्णन करणे अशक्यचं! त्यातल्या अगदी छोट्याशा रोलमधील कलाकारही अजुनही कायमचा लक्षात आहे. ह्याच चित्रपटातील सुप्रसिध्द कलाकार लक्ष्मिकांत बेर्डेची सहकलाकार प्रेयसीची भुमिका निभावलेली आवडी सगळ्यांनाचं आवडलेली.

सहजसुंदर ग्रामिण बाजाचा अस्सल अभिनय आणि आपल्या सुंदरतेने तिने प्रेक्षकांत एक क्रेझ निर्माण केलेली. आवडीचे ओरीजनल नाव पुजा पवार-साळुंके असुन तीने वयाच्या १६’व्या वर्षातचं चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले होते. अजिंक्य देवसोबतचा पहिल्याचं “सर्जा” ह्या चित्रपटाने १९८७ सालचा ऊत्कृष्ठ मराठी चित्रपटाचा “राष्र्टीय पुरस्कार” जिंकत आपली छाप सोडलेली. पुढे पुजाला डाॅ.जब्बार पटेल,चंद्रकांप कुलकर्णी,विक्रम गोखले,महेश कोठारे आणि राजदत्त यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली जिने तिचे करीअर टाॅपला नेले.

पुजाने आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरडुपरहिट मराठी चित्रपटांत भुमिका केल्या. त्यात टोपीवर टोपी (१९९५), चिकट नाना,एक होता विदुषक (१९९२), झपाटलेला (१९९३) आणि विश्वविनायक (१९९४) हे आहेत. पण लग्नानंतर पुजाने चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला आणि ती आपल्या मुलीचे संगोपन करीत संसारात रमली ती थेट १५वर्षं पुनरागमन होईपर्यंत….२०१४ मध्ये “हेडलाईन” द्वारे तिने पुन्हा मायानगरीत प्रवेश केला.

२०१७ मधील “गोंदण” आणि मनीष पोवारचा “धोंडी” हे तिचे अलिकडच्या काळातील नावाजलेले सिनेमे ठरले. सध्या मराठी मालिकांतही ती सक्रिय झाली असीन झी टीव्हि मराठीवरील “कारभारी लयभारी” मध्ये ‘काकीसाहेब’ आणि “आई कुठे काय करते?” मध्ये अंकिताच्या आईच्या ह्या दोन्हि व्हिलन व्यक्तीरेखेत ती छोट्या पडद्यावरही प्रचंड गाजतेय. अश्यारितीने मराठी चित्रपटसृष्टी सर्वांगाने गाजवलेल्या ह्या अभिनेत्रीचे हे सुंदर फोटो पाहुन आपल्याला कळले असेलचं कि आजही ही लक्ष्याची आवडी किती सुंदर दिसते.

तिची मुलगी “आलिशा” ही देखील आता मोठी झाली असुन आईप्रमाणेचं तीही सुंदर दिसते. सोशल मिडीयावरही दोघी अतिशय सक्रिय असतात. फेसबुक व ईन्स्टाग्रामच्या माध्यमातुन त्या आपल्या सिनेरसिकांच्या कायम संपर्कात असतातचं पण तिच्या सुंदर फोटोंनी सर्वांस घायाळ करतेचं! पुजा पवार-साळुंके ऊर्फ आपल्या लाडक्या आवडीस पुढील भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा!
स्वप्नील लव्हे

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *