“उर्मिला मातोंडकर चा नवरा पहा कोण आहे?”

“रंगीला रेऽऽऽ” म्हणत बॉलीवूडला अनेक हिट चित्रपट देणारी ‘रंगीला गर्ल’ उर्मिला मातोंडकर ही सन-२०१६ला वयाच्या ४२’व्या वर्षी लग्न बंधनात अडकली आहे. मुळच्या कश्मीरस्थित व्यावसायिक आणि मॉडेल मोहसिन अख्तर मीर सोबत उर्मिलाने लग्नगाठ बांधली. एका हॉटेलमध्ये छोट्याशा समारंभातव अगदी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा झाला. उर्मिला मातोंडकरविषयी तर आपल्याला तशीही खुप माहिती आहेचं. आता तिचा नवरा मोहसिन अख्तरविषयी जाणून घेऊयात.

उर्मिलाचा नवरा मोहसिन अख्तर मीर हा काश्मीरमधील मोठा व्यावसायिक आणि मॉडेल आहे. त्याचा कपड्यांचा व्यवसाय आहे.बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि पक्षाने तिला उत्तर मुंबईचं तिकीट दिलं. उर्मिलाला तिकीट मिळताच तिच्याविरोधातल्या अफवांना उधाण आलं होतं.

काही फेसबुक आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये उर्मिलाच्या पतीवरून तिच्यावर निशाणाही साधला गेलेला. सोशल मीडिया ग्रुपमध्ये उर्मिला आणि तिच्या नवऱ्याचे फोटो शेअर करत त्याखाली ‘फार कमी लोकांना माहीत आहे की उर्मिलाने पाकिस्तानी व्यक्तिशी लग्न केलं,’ अशा पद्धतीचा मेसेज व्हायरल केला गेला होता. काहींनी तर उर्मिलाने धर्म बदलल्याचेही पोटतिडकीने लिहिलेले होते. ४२ वर्षीय उर्मिलाने तिच्याहून नऊ वर्ष लहान असलेल्या मॉडेल आणि व्यावसायिक प्रियकर मोहसिन मीर अख्तरशी लग्न केलं.

उर्मिलाचा नवरा मोहिसन अख्तर मीर हा काश्मीरमधील मोठा व्यावसायिक आणि मॉडेल आहे. त्याचा कपड्यांचा व्यवसाय आहे. २०१६ मध्ये उर्मिलाने अगदी मोजक्यांच्या मित्र- परिवाराच्या उपस्थितीत लग्न केलं. २०१४ मध्ये फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या भाचीच्या लग्नात उर्मिला आणि मोहसिनची पहिल्यांदा भेट झाली. मोहसिन अख्तरने स्पष्ट केलं होतं की, लग्नानंतर उर्मिलाने तिचं नाव आणि धर्म दोन्ही बदलले नाहीत.
मोहसिनविषयी आणखी काही…

१. ‘टाइम्स ऑफ इंडिया प्रायोजित मिस्टर इंडिया-२००७ ‘ स्पर्धेमध्ये फ्रेडी दारुवालाने प्रथम, कवलजीत आनंद सिंह याने दुसरा तर मोहसिनने तृतीय क्रमांक पटकावला होता. २. ‘अ मॅन्स वर्ल्ड’ मध्ये त्याने सेक्स वर्करची भूमिका साकारली होती. ३. मोहसिनने २१ व्या वर्षी मॉडेलिंग करण्यासाठी त्याचे काश्मिरमधील घर सोडले. त्यावेळी त्याने लग्न करावे अशी त्याच्या आईची इच्छा होती. मात्र, मोहसिनने त्याच्या करियरला प्राधान्य दिले.

४. २०११ साली प्रदर्शित झालेल्या ‘मुंबई मस्त कलंदर’ या चित्रपटात त्याने काम केले होते. ५. ‘लक बाय चान्स’ या चित्रपटात त्याने ‘कुणाल’ची व्यक्तिरेखा साकारली होती. ६. डिझाइनर मनिष मल्होत्राकडे त्याने इन-हाउस मॉडेल म्हणून काम केले होते. ७. मोहसिनने तरुण कुमार, मनिष मल्होत्रा, विक्रम फडणीस, रन्ना गिल या डिझाइनर्ससाठी रॅम्पवॉक केला आहे. ८. मोहसिन उर्मिलापेक्षा जवळपास १० वर्षांनी लहान आहे. ९. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक ए आर रहमान याच्याही एका अल्बममध्ये मोहसिन झळकला होता. अश्या ह्या जोडप्याला पुढील वैवाहिक जिवनासाठी शुभेच्छा! ।😊
स्वप्नील लव्हे

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *