ही होती लाडक्या लक्ष्या ची पहिली बायको!”

लक्ष्या….सगळ्यांना आपलासा वाटणारा हा मराठी विनोदी नट. त्याच्या हरेक हरहुन्नरी विनोदी भुमिकेने नव्वदीच्या दशकाचे भरपेट मनोरंजन तर केलेचं पण मराठी चित्रपटसृष्टी तारलेली! अशोक सराफ,लक्ष्या आणी महैश कोठारे हे तिघेही त्रिदेव मराठी रंगभुमीला पडलेले एक सुवर्णर्वप्न ठरले. ह्या त्रयींचे आलेले हरेक चित्रपट “हाऊसफुल्ल”चा बोर्ड झळकावत त्यांच्या अभिनयाला सलाम ठोकतचं राहिले. पण त्यांचा हा जिवलग मित्र लक्ष्या मात्र अर्ध्यावर डाव मोडुन २००४ मध्ये वयाच्या ५४’व्या वर्षी सर्व सिनेरसीकांना रडवुन कायमचा निरोप घेता झाला.

गणेशोत्सव आणि काॅलैजमधील स्टेज शो आणि स्पर्धांमधुन सहभाग घेत त्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलेली. १९८३-८४च्या पुरुषौत्तम बेर्डे चषकातील “टुर-टुर” ह्या नाटकाने त्याला संधी मिळाली. पुढे “शांतेचं कार्ट चालु आहे!” “बिघडले स्वर्गाचे दार” ह्यांमधुन तो प्रसिध्दीस आला. पुढे १९८५ साली “लेक चालली सासरला” चित्रपटातुन त्याने सिनेसृष्टीत पदार्पण केले आणि मग मागे वळुन न पहाता “दे दणादण” “धुमधडाका” “अशी ही बनवाबनवी” “थरथराट” “बाळाचे बाप ब्रम्हचारी” “झपाटलेला” व ईतर….सारखे एकापाठोपाठ सुपरडुपर हिट सिनेमे तिकीटबारी ओसंडुन वहात राहिले.

त्याचबरोबर हिंदी सिनेमातही लक्ष्याने “हम आपके है कौन!” “मैने प्यार किया” “बेटा” “साजन” द्वारे धुमाकुळ घालत जगभर गाजला. सिनेसृष्टीत गाजलेला लक्ष्या आपल्या वैयक्तीक आयुष्यातही खळबळजनचं ठरला. “कमाल माझ्या बायकोची” ह्या चित्रपटादरम्यान त्याची ओळख चित्रपटातील अन्य कलाकार “रुही”शी झाली व मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले व त्यांनी विवाह केला. तिच्याचं ओळखीने त्याला चित्रपटसृष्टीत सुरवातीला कामही मिळत गेले कारण तिने शशी कपुरसह हिंदी चित्रपट “आ गले लग जा” केलेला आणि तिची विशैष अशी ओळख होती.

परंतु, ह्या जोडीच्या सुखी संसाराला ग्रहण लागले आणि त्याचे निमित्त होते “रमत-गमत” चित्रपटादरम्यान झालेली प्रिया अरुण व लक्ष्याची ओळखाव पहिल्याचं भैटीतील प्रेमप्रकरण. पुढे वादंग होत राहिले पण लक्ष्याने प्रियासोबत नाते काही तोडले नाही व ना प्रियाशी घटस्फोट घेतला.तो नंतर प्रियासोबत लिव्हईन रिलेशणशीपमध्ये राहु लागला. पुढे १३वर्षांनंतर कॅन्सरच्या आजाराने रुही चे दुःखद निधन झाले व लक्ष्याचा पहिला संसार मोडला पण त्याने लगेचं पुढील वर्षी प्रिया अरुणशी संसार थाटला. आज लक्ष्या काही आपल्यात नाहियं. त्याच्यामागे प्रियाला “अभिनय” व “स्वानंदी” अशी पुढील पुढीची जबाबदारी देउन त्यानेही एक्झिट घेतली. अभिनय वडीलांप्रमाणेचं मराठी सिनेसृष्टी गाजवतोय. प्रिया व अभिनय आणि स्वानंदीस पुढील कार्यास शुभेच्छा!
स्वप्नील लव्हे

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *