कवट्या महाकाळ नक्की होता तरी कोण

पंचाक्षरी चित्रपटाची रिघ लावणार्या महेश कोठारेंनी एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टी पुर्णपणे एकहाती काबाज केली होती. विनोदी तसेच नवनविन कल्पना लढवत रहस्यमयी आणि अस्सल गावरान विनोदाचा बाज असलेली व अपरीचित कॅरैक्टर्सचा भरणा असलेले चित्रपट मराठी पडदा गाजवत हाऊसफुल्लचा बोर्ड झळकावत राहिले. अशातचं महेश कोठारे व लक्ष्मिकांत बेर्डे द्वयीचा एक चित्रपट १९९० साली आला ज्याने तुफान लोकप्रियता मिळवली.

लक्ष्मिकांत बेर्डे मध्यवर्ती भुमिकेत असलेला हा चित्रपट गंगाराम नावाच्या जादुई कॅरैक्टर्स भोवती फिरतो कि ज्याची दुहेरी भुमिकाही स्वतः लक्ष्यानेचं निभावलेली. पण ह्या चित्रपटात नायकापेक्षा खलनायकाचे पात्र कि ज्याचे नाव होते कवट्या महाकाळ हेचं जास्त गाजले. बाटलीतील गंगारामची ग्रॅण्ड एण्र्टी व त्याकाळचे ग्राफिक्स आणि गाजलेला हा संवाद भाव खाऊन गेला व मराठी सिनेमांत नवीन ट्रेंडसेटर ठरला! ज्याची असते शक्ती अपूर्व, ज्याचे असते धेय्य अचूक!

तोच दिपवू शकतो जगाला…होऊन खरा धडाकेबाज…! ह्या पात्राची कल्पनाही अजबचं होती. आपल्या चित्रपटांच्या रिव्ह्युसाठी महेश कोठारे गावागावांत फिरायचे. असेचं ते फिरत असताना पुढील चित्रपटासाठी कॅरेक्टर्सच्या नावाचा विषय डोक्यात घोळत असताना ते पोहोचले कवठे महांकाळ गावात! हे नाव त्यांच्या डोक्यात पक्के बसले व आपल्या चित्रपटातीव व्हिलनला द्यायचे त्यांनी ठरवले. पण ह्या खलनायकाचा चेहरा नेहमी अंधारात ठेवत फक्त अंगावरील सापळ्याचे कपडे व डोक्यावर मानवी कवटी दाखवली गेली.

ज्यामुळे बाहुबलीमधील कटप्पाने बाहुबलीला का मारले ह्या ऊत्कंठावर्धक प्रश्नाचे ऊत्तर तरी पुढील भागात २वर्षांनी कळले पण आजतागायत म्हणजे गेली २५-३०वर्षै झाली हा कवट्या महांकाळ नक्की कोण होता हे गुलदस्त्यातचं राहिले आहे. संपुर्ण चित्रपटात कुठेही ह्या खलनायकाचा चेहरा दिसला नाही व ह्या गोष्टीने पब्लिकला आकर्षित केले. तर ,आज आम्ही आपल्याला ह्याचा ऊलगडा करण्पाचा प्रयत्न करणार आहोत….ह्या खलनायकी पात्राला न्याय देणारे कलाकार होते बिपीन वारती.

बिपीन हे मुळचे दिग्दर्शक आणि त्यांनी महेश कोठारेंचे एक गाडी बाकी अनाडी चंगु मंगु डाॅक्टर डाॅक्टर सारख्या चित्रपटांची निर्मिती केलेली आहे. व धुमधडाका,अशी ही बनवाबनवी ,भुताचा भाऊ ह्या चित्रपटांत छोटी भुमिकाही निभावली आहे. असे असले तरी त्यांना आपल्या सततच्या व्यस्त शेड्युलमुळे धडाकेबाज चित्रपटातील हा रोल पुर्णपणे निभावता आला नाही. व हा रोल तब्बल आठ जणांनी साकारला ज्यांची नावे खुद्द महेश कोठारेंनाही आज आठवणे मुश्किल ठरते असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. पण ह्या भुमिकेतला आवाज मात्र बिपीन वर्ती ह्यांचाचं होता हे कोठारेंनी खात्रीपुर्वक सांगितले आहे.
स्वप्नील लव्हे

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *