सर्व सामान पॅक करुन अजय देवगण मुंबईला रामराम ठोकत गेला कुठे? तीन महिन्यांपासुन घरी परतलाचं नाही….?”

“प्रसिध्द अभिनेता अजय देवगण आपले बाडबिस्तर गुंडाळुन फॅमिलीसह मुंबई सोडुन गेलाय म्हणे?” अशी बातमी आली आणी सर्व सिनेरसिक आणि सिनेसृष्टीत एकचं खळबळ माजली. नक्की काय कारण होते ह्यामागे? ही अफवा आहे की तथ्य? हे खरे तर खोटे काय?ृबाॅलीवुडमध्ये धुमाकुळ घालणार्या आणि संपुर्ण सिनेसृष्टीवर संकट ठरलेल्या काही प्रखर विचारांच्या बाॅयकाॅटट्रेंडला वैतागुन त्याने असा निर्णय घेतला असावा का? ह्याच गोष्टीचा ऊहापोह करण्याचा आमचा हा एक प्रयत्न..

अजय देवगण- नव्वदीच्या दशकापासुन संबंध काॅलेजयुवावर्ग आणि तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेला अभिनेता. “फुल और काँटे” सारख्या प्रेमसंबंधांवर आधारलेल्या मारधाड चित्रपटातुन सन-१९९१ पासुन सिनेसृष्टीत अजय देवगणने पदार्पण केले. नंतर आलेले दिलवाले,दिलजले, हम दिल दे चुके सनम, सिंघम,गोलमाल,दृश्यम व ईतर आणि नुकताचं मराठीत गाजलेला “तान्हाजी” हा शिवकालीन चित्रपटही अजयने आपल्या अभिनयाने वेगळ्याचं ऊंचीवर नेऊन ठेवलेला.

अभिनेत्री काजोलसोबत काम करताना दोघात भावनिक नाते तयार झाले व ही जोडी तरुणाइतही खुप गाजली आणि जोडीचे चित्रपट विशेष गाजु लागले. नवस केल्याप्रमाणे “प्यार तो होना ही था” ने यश मिळवले आणी ही जोडी १९९९मध्ये बोहल्यावर चढली. न्यासा-२००३ व युग-२०१०अशी दोप अपत्ये त्यांना झाली. तान्हाजी चित्रपटानंतर आलेल्या कोरोना महारोगराईचा काळ आणि ऑनलाईन चित्रपटांची क्रेझ व त्यातचं थिएटरांचेही बंधनांमुळे बंद असणे मुळावर आले. पुढे थिएटर ऊघडल्यानंतर चित्रपटही फारसे चालेनासे झालेत.

कहर म्हणजे बाॅयकाॅट ट्रेंडने नेस्तनाबुत स्थिती ओढावली गेली. अश्याचं परीस्थितीत अजय देवगण फॅमिलीसह मुंबईतील आपल्या राहत्या घराबाहेर पडला व तब्बल तीन महिन्यांनी विदेशाहुन परतला पण त्याने घरी येणे पसंत केले नाहीचं! तो सरळ हैद्राबादला निघुन गेला. सखोल माहीती घेतली असता असे निदर्शनास आले की वरीलपैकी कुठल्याही गोष्टींत तथ्य नसुन अजय फॅमिलीसह परदेशात फिरण्यासाठी गेला होता व

परतल्यानंतर आपल्या आगामी चित्रपटांच्या शुटींगसाठी तो रामोजी फिल्म सिटी येथे गेला. तेथे त्याच्या “दृश्यम-०२” आणी “भोला” ह्या दोन्ही हिंदीतील रिमैक सिनेमांचे बीझी शेड्युल असल्याने एकाचं ठिकाणी शुटींग सुरु आहे. एका नावाजलेल्या ईंग्रजी वृत्तपत्रातील खात्रीशीर बातमीच्या हवाल्याने ही तथ्यं समोर आली व सर्व सिनेरसिकांसह सिनेसृष्टिचा जीव भांड्यात पडला.
स्वप्नील लव्हे

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *