NMJOKE

“झपाटलेला मधील कुबड्या खवीस नक्की होता तरी कोण?”

“लक्ष्याऽऽऽ गप पडुन रहा! आता माझा आत्मा तुझ्यात आणि तुझा आत्मा ह्या बाहुल्यातऽऽऽ
“ओम भग्नी भागोदरी भग्नीभुगै भग्नीयोनी ॐ फट स्वाहाः।”
ह्या संवादाने चड्डी ओली करणारी नव्वदीची बालपीढी आज प्रौढ झाली असली तरी तो बोलका बाहुला,तात्या विंचु आणि त्याचा खतरनाक सहकारी कुबड्या खवीस ही पात्रे आजही अंगावर रोमांच ऊभे करतात आणि पुन्हा एकदा त्या जादुई दुनियेत घेऊन जातात. “द चाईल्डस् प्ले” ह्या १९८८ सालच्या हाॅलिवुड पटावर महेश कोठारेंनी त्यावेळी मराठी चित्रपटसृष्टीत धाडसी प्रयत्न करीत “झपाटलेला” नावाचा आणखी एक लकी असलेल्या पाचअक्षरी चित्रपट आणला. त्यावेळी बोलक्या बाहुल्यांचे प्रयोगही नवखे होते आणि खुपचं गाजत होते.

ह्याचाचं फायदा घेत सतत नाविन्याचा ध्यास घेतलेले महेश कोठारे ह्यांच्या कल्पक डोक्यातुन ह्या चित्रपटाचे एकेक कॅरैक्टर्स निर्माण झाले. तात्या विंचु ह्या खलनायकी भुमिकेसाठी दिलीप प्रभावळकर आणि बोलक्या बाहुल्याचा खेळ करणार्या मुख्य अभिनेत्याची भुमिका लक्ष्मिकांत बेर्डै तर तात्या विंचुचा सावलीसारखा एकनिष्ठ साथीदार म्हणुन “कवट्या महांकाळ”च्या भुमिकेत गाजलेल्या “बिपीन वारती”, मांत्रिक म्हणून “रविंद्र कडकोळ” ह्यांना संधी देण्यात आली

तसेच सहकलाकार म्हणुन ईन्स्पेक्टर स्वतः महेश कोठारे व त्यांची प्रेयसी निवेदिता सराफ आणि लक्ष्याची प्रेयसी किशोरी आंबिये आणि त्याची आई म्हणुन मधु कांबीकर सह विजय चव्हाण-मामा, रविंद्र बेर्डे ह्यांनी आपापल्या भुमिकेचे सार्थक केले. महामृत्युंजय मंत्रानी अमर व्हाता येते अशी भलावणा केलेल्या गुन्हेगार तात्या विंचु त्यासाठी बाबा चमत्कारला चिक्कार रक्कम देतो. पण त्याचा स्वभाव जाणुन असल्याने पुढील धोका व संहार टाळण्यासाठी बाबा चमत्कार त्याला हुलकावणी देत टोलवाटोलवी करत राहतो.

पण एकेदिवशी तात्या विंचु कुबड्यासमवेत बाबाचा जीवचं घ्यायला निघतो तेव्हा कुठे वैतागुन बाबा चमत्कार त्याला दिक्षा देउन टाकत व त्या मंत्राचा वापर कसा करायचा हे सांगतो. पुढे लगेचं ईन्स्पेक्टर महेश त्याचे एन्काऊंटर करत खात्मा करतो पण महामृत्युंजय मंत्रानी तात्या विंचु एका बाहुल्यात प्राण विराजमान करत देह सोडतो. पुढे हा बाहुला लक्ष्याकडे येतो व मग चित्रपटात होणारा गोंधळ सगळ्यांचे मनोरंजन करतो. विनोदशैलीत तुफान थरार आणि काहीशा मारधाड प्रकारचा हा सिनेमा एका रहस्यमयी वळणावर येत शेवटी तात्या विंचुचे बाहुल्यातुनही निर्दालन होते व सर्वजण सुटकेचा श्वास घेतात.

रामदास पाध्येंनी ह्या चित्रपटासाठी विशेष मेहनत घेत बाहुला बनलेला तात्या विंचुची एकेकाळी धडकी भरवलेली. कुबड्याचे नावाप्रमाणे कुबडी चाल व टोळीमालक तात्यास साथ व लक्ष्याची धमाल काॅमैडीने हा चित्रपट अजरामर झाला व हे सर्व पात्रे आजही आठवणींत आहेत व हा चित्रपट पाहावासा वाटतो. बिपीन वार्तींच्या कुबड्याच्या भुमिकेला प्रेक्षकांनी कवट्या महांकाळसारखेचं डोक्यावर घेतलेले. ग्रामिण व शहरी भागातही एकमैकांना ह्या नावाने चिडवणे व्हायचे व शाळा-काॅलैजात तर ह्या चित्रपटाच्या नावांनी एकमेकांस हाका मारल्या जायच्या. पुढेही अशीचं चित्रनिर्मिती महेश कोठारे ह्यांच्याकडुन झाली व सहकलाकार मंडळींकडुन त्यांनाही मोलाची साथ नेहमीचं लाभली.
स्वप्नील लव्हे

Exit mobile version