सुबोध भावेची पत्नी पहा कशी दिसते? काय करते?”

आपल्या अंगभुत कलागुणांनी चित्रपटसृष्टीत गाजलेला सर्वगुणसंपन्न कलाकार म्हणजे “सुबोध भावे” . कुठलाही चरीत्रपट असोत की ईतर विषयांवरील चित्रकथा ती हुबेहुब साकारणारा कलाकार म्हणजे सुबोध भावेचं. म्हणुनचं, “लोकमान्य टिळक” “बालगंधर्व” ” कट्यार काळजात घुसली” ते अगदी कालपरवाचा “…आणि डाॅ.काशीनाथ घाणेकर!” ह्या सर्वचं व्यक्तीरेखा सहजरित्या त्यांच्या प्रत्येक लयीतुन सादर होताना पाहणे एक पर्वणी ठरते. सुबोध मुळचा पुणेकर.

ईथेच शिकुन पुढील महाविद्यालयीन शिक्षण त्याने सिम्बोयसीस काॅलैजमधुन काॅमर्सची पदवी घेत पुर्ण केले. चरीतार्थासाठी सेल्समन पदावर कोरेगाव पार्कातील एका आयटी कंपनीत रुजुही झाला पण तिथे न रमता तो नाट्यचित्रसृष्टील शिरला आणि स्थिरावलाही. मूळचा हा पुणेकर आता पक्का मुंबइकर झालाय. सुबोधची सुविद्य पत्नी म्हणजे “मंजीरी”… ही त्याची बालमैत्रीण होय.

पेशाने ती एक कम्प्युटर ईंजिनीअर आहे. त्यांची ओळख एका नाट्यशिबीरात झाली. मंजीरी आठवीत तर सुबोध दहावीत. पुढे शालेय शिक्षणानंतर मंजिरी फॅमिलीसह कॅनडाला गेली आणि नशिबाला मान्य नसलेली ही मैत्री काळ दुरावली. तरीही जवळपास पाच वर्षै लाँग डिस्टान्स रिलेशिनशीपमध्ये रहात त्यांनी आपल्या प्रेमात मात्र तसुभर अंतर पडु दिले नाही. एकमेकांच्या संपर्कात रहाण्यासाठी त्यावेळची संपर्कसाधने म्हणजेचं पत्रव्यवहार आणि याहु मँसेजरचा वापर त्यांनी खुबीने केला.

तिने लिहीलेल्या पत्राचे ऊत्तर यायला जवळपास १५-२०दिवस लागायचे. तिला जरी १५-२०₹/मिनिट फोन करणे शक्य असले तरी तेव्हा जवळपास १००+₹/प्रतिमिनिट खर्च करणे ईकडे सुबोधला जमायचे नाही आणि “तु कशी आहेसऽऽऽ मी बरा आहे. चल,ओके ऽऽबाय” म्हणत आठवणींत रमत काळ ढकलला जायचा. पण,हाच संघर्ष सरुन गेल्यावर साथ न सोडता पुढे लग्न करत त्यांनी आपला संसार थाटला. ह्या संसारवेलीवर “कान्हा” आणि “मल्हार” अशी दोन गुणी पुत्ररत्नेही लाभली.
©️स्वप्निल लव्हे

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *