होम मिनीस्टरमधुन सर्व वहिंनीशी खेळणार्या आदेश बांदेकरांची होम मिनीस्टर आहे तरी कोण?”

“चला तर आता खेळुया…आपला आवडता खेळ….होम मिनिस्टरऽऽऽ!” अवघ्या महाराष्र्टासह जगात गाजलेला हा झी टिव्ही निर्मित अस्सल मराठी घरगुती कार्यक्रम आदेश बांदेकरांनी आपल्या सुत्रसंचालनाने प्रचंड लोकप्रिय केला. म्हणुनचं गेली १६+ वर्षै हा शो आजही नवनविन स्वरुपात आपल्यासमोर येत आहे किंबहुना आपल्या घरी खेळला जात आहे. प्रेमी युगुलाचे जोडपे असोत की परदेशी स्थाईक सर्वांना एकेक प्रश्न विचारत आपलेसे करणारा व बक्षिस म्हणून रोख रक्कम व पैठणीसाडीसह ईतरही बक्षिसांची ऊधळण करणारा हा शो सर्वांना आवडतो.

सर्वांना लागलेली ऊत्सुकता अधिक न ताणता आज आम्हि आपणांस आदेश बांदेकरांच्या होम मिनीस्टर म्हणजे सौ.सुमित्रा बांदेकर ह्यांचा परीचय करुन देणार आहोत. सुचित्रांचा जन्म नाशिक येथे झाला.आपले प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर मुंबईच्या डीजी रुपारेल काॅलेज मधुन महाविद्यालयीन शिक्षण घेतले. आणि त्यांची ओळख आदेशजींशी झाली. एका दुरदर्शन मालिकेत काम करताना पहिल्या भेटीतचं आदेश त्यांच्यावर फिदा झालेले.

ते सतत त्यांच्या भोवती फिरत असत,ज्याला वैतागुन सुचित्रांनी त्यांना डायरेक्ट “माझ्यामागे फिरु नकोस मी काही तुला हो म्हणणार नाही!” असे सुनावले होते. पण त्यांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या आदेशजींनी त्यांचा पिच्छा काही सोडला नाहीचं! काही दिवसांनी त्यांना दादरमधील एका हाॅटेलात भेटायला बोलावले. काहीशा घाबरलेल्या सुचित्रांनी आपल्या मैत्रीणीला सोबत घेतले पण त्या हाॅटेलवर गेल्याचं नाहीत. बराच वेळ वाट पाहुन वैतागलेले आदेशजी सरळ त्यांच्या घरी गेले. घरी आल्यावर सुचित्रा बघतात तर काय आदेश व त्यांची आई घरी मस्त गप्पा मारत बसलेले.

नंतर आई व आदेश हे दोघेही आईला बाहेर काही काम असल्याने एकत्र सोबत घराबाहेर पडले. अणि वाटेत काहीतरी बहाणा करुन ते अईला सोडुन निसटले आणि थेट घरी येत सुचित्रांना विचारले “हे बघ,मी तुला महालक्ष्मिला घेऊन जाणार होतो! तुझा होकार असला तर कळव नाहीतर ही आपली शेवटची भेट!” असे निर्वाणीने बोलले. आता परत काही आपली भेट होणार नाही ह्या विचाराने कासावीस झालेल्या व मनाततल्या मनात प्रेम करु लागलेल्या सुचित्रांनी “कधी जायचयं महालक्ष्मिला?” असे विचारले.

परंतु,त्यांच्या प्रेमाला घरुन मात्र तीव्र विरोध होता कारण आदेशजी तेव्हा खुप स्र्टगल करत होते. पण सुचित्रांनी ठाम भुमिका घेत काॅलेजला जाते असे घरी खोटे सांगत बांद्रा कोर्टात हाचं होकार पुढे लग्नात रुपांतरीत करत हे जोडपे विवाहबध्द झाले. आज ३०+ वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतरही हे जोडपे आपले प्रेम मात्र तसेच टिकवुन आहे. त्यांना सोहम नावाचा एक मुलगा आहे. सुचित्रा ह्यांनी ई.नववीत असल्यापासुन मनोरंजन क्षेत्रात मालिकांमधुन काम करत पदार्पण केलेले.

दुरदर्शनवरील त्यांच्या सुरवातीच्या काळातील तहकिकात”, “व्योमकेश बक्षी” व “हम पाँच” ह्या मालिका प्रचंड लोकप्रिय ठरल्या. तसेच मराठी, हिंदीचित्रपटसृष्टीतही त्यांनी काम केलेले आहे. “मी शिवाजीराजे भोसले बोलतोय!” मधील “सुमित्रा भोसले” ह्या मराठी गृहिणीच्या कणखर भुमिकेने त्यांना प्रसिध्दी मिळवुन दिली. हिंदी तसेच मराठी सिनेमे “सिंघम”, “सिंबा” , “रमा माधव” व ईतर ह्यांनीही यश प्राप्त केले व तिकीटबारी गाजवलेली. अश्या ह्या गुणी अभिनेत्री व आदेशजींच्या होम मिनीस्टरला पुढील वाटचालीस आमच्या टीमतर्फै शुभेच्छा!
©️स्वप्निल लव्हे

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *