माधुरी दिक्षितचा नवरा कसा दिसतो? काय करतो?

“डाॅ.श्रीराम नेने” नव्वदीच्या दशकातील सर्वांची आवडती अभिनेत्री आणि करोडो सिनेरसिकांच्या ह्रदयावर राज्य करणारी स्माईलगर्ल,धकधकगर्ल वन ॲण्ड ओन्ली ड्रीमगर्ल म्हणजेचं “माधुरी दिक्षित” पण आपल्या नृत्य आणि अभिनयाने भुरळ घालणारी माधुरी “एक…दोन ….तीनऽऽऽ करत कधी मुंबई सोडुन अमेरिकेत गेली कुणालाचं कळले नाही. अचानक लग्नाचा घेतलेला निर्णय आणि ते ही एका अनोळखी परदेशी अनिवासीय भारतीयाशी? ह्या गोष्टीने सर्वांचाच पुरता हिरमोड झालेला.

ऐकीव बातम्यांचे खरे मानले तर माधुरी संजय दत्तच्या प्रेमात साजन,खलनायक करताना पुर्ण बुडालेली. पण संजय दत्तच्या मागे १९९३ बाॅम्बस्फोट चौकशीचा ससेमीरा लागला आणि त्याच्यापासुन तिला विभक्त व्हावे लागले. तिच्या बहीणीने आणलेले हे स्थळ तिने अनिच्छेनेचं का होईना तेव्हा पसंत केलेले! आणि तिच्याचं शब्दांत प्रकट मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे तिचा भाऊ अजितच्या एका पार्टीत लंडनमध्ये दोघांची भेट व पुढील भेटींतुन प्रेम ऊदयास आलेले….बाकी खरे खोटे ईश्वरास ठाऊक! पण, आज २३वर्ष मागे वळुन पहाताना एक सुखी कुटुंब अशी आपण ह्या जोडप्याची ओळख म्हणु शकतो.

लंडनमध्ये अनिवासी भारतीयांच्या पोटी जन्मलेले डाॅ.श्रीराम नेने हे व्यवसायाने सर्जन आहेत व ते आपली प्रॅक्टीस अमेरिकेत करतात. लग्न झाल्यानंतर त्यांना कळले की आपली बायको माधुरी ही भारतातील सुप्रसिध्द अभिनेत्री आहे व त्यांनी तिचे काही निवडक चित्रपटही बघीतले. मूलं मोठी झाल्यावर माधुरीनेही नुकतेचं दुरदर्शवरील डान्सशोच्या जज म्हणून पुन्हा मनोरंजनसृष्टीत पाऊल टाकलेय. आपल्या पत्नीला समान दर्जा व तिच्या कामाचा आदर करणारे डाॅ.नेने तिच्यासाठी खास डीशैस बनवणे व तिच्यासोबत किचनमध्येही समान काम करणे पसंत करतात.

माधुरीसोबतचे सतत नवनविन मुड व प्रसंगानुरुप फोटो ते सोशल मिडीयावर शेअर करत आपले दृढ नाते जगासमोर ठेवतात. अश्या ह्या सुंदर आणि आदर्श जोडप्याच्या संसारवेलीवर दोन गोंडस फुले म्हणजेचं मुलेही आहेत. एक रियान तर दूसरा अरिन! आपल्या वडीलांसोबत गेल्यानंतर एकदा एका कॅन्सर पेशंटला आपले केस गमवावे लागण्याचे दुःख पाहुन ह्या हळव्या लेकराने त्याच्यासाठी दोन वर्ष आपले केस वाढवले व ते दान केलेले…असे हे परदेशात राहुनही दिलेले ऊच्चप्रतीचे संस्कार!

माधुरिने सन-२००६ मध्ये भारतात येऊन “आजा नचले” चित्रपटातुन पुनरागमन केलेले. आपल्या पत्नीच्या आवडीचा आदर करणार्या डाॅ.नेनेंनी “डान्स विथ माधुरी” ह्या शोजचि निर्मिती करुन तिच्या MD/CEO पदी राहत भरभक्कम साथ दिली आहे. त्यांनी स्थापलेली “पाथफाईंडर लाईफसायन्सेस” सारखी संस्था ऊच्च जिवनमुल्ये आणि आरोग्य सांभाळण्याची कला आणि तीही आजच्या हायटेक टेक्नाॅलाॅजीसह प्रदान करते. भारताचेही आरोग्य सतत सुधारणेच्या डाॅ.नेनेंच्या ऊज्वल ध्यासास आमच्या शुभेच्छा!!!
©️स्वप्निल लव्हे

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *