“पायल सावंतचा डान्स पाहुन आजीला आवरेना हसु!”

“जगात सगळचं क्लासिक ग्लोबल होत असताना मग अस्सल मर्हाटमोळी परंपरा का मागे पडेन?” लग्नकार्यै असोत की देवीदेवतांची यात्रा देवीचा जागरण-गोंधळ हा आलाचं. पुर्वीच्या काळी कुलदेवी आणी कुलदैवत खंडोबाचा जागरण-गोंधळ अगदी पारंपारीक पध्दतीने व्हायचा. त्यात खंजीरी,डफ असायचे व समईला तेल घालणार्या दिवट्याची खेचत पुराणकथा व विविध देवीदेवतांचे अंगात येणे वगैरे प्रकार चालायचे.

मेव्हणा-मेहुणी व पाहुण्यांराऊळ्यांचे वाघ्यामूरळींना पैसे देऊन आवडती पुराणगाणीकथा सादर करायला लावत व सर्व पाहुणेमंडळी आणि गावकरी रात्रभर जागुन ह्या जागरण गोंधळात सहभागी व्हायचे. आबालवृध्दांसह सर्वांसाठी हा एक सोहळा ठरायचा! पण, आज सर्वत्र झगमगाट आलाय आणि सिनेमांचे अनुकरण करत ह्या पारंपारीक प्रथेत आणि लोककलैतही ग्लॅमर घुसलेचं!

वाघ्यामुरळीसह फेर धरीत वरातीलाही लाजवणारे डान्स होताना सर्वत्र दिसताहेत. आणि हे नाचेमंडळींचे व्हिडीऔ सोशल मिडीयावर क्षणार्धात पसरुन कैक लाखांत पब्लिक त्याला पहाते आहे. हसावे की रडावे अशी ही एकुणात परीस्थिति! ऊत्तरैकडील राज्यांप्रमाणे ह्या कार्यक्रमातही पैश्यांची ऊधळण अगदी हिडीसपणे आढळु लागली आहे. देवीदेवतांची गाणी सोडुन ऊच्र्छुंंकल बीभत्स गाणी व त्या तालावर फेर धरणारी डान्सर्स व गडगंज पैशेवाली आणि सोबतचं गुरांप्रमाणे अंगावर सोन्याच्या माळा थापणारे गुंठामंत्री त्यांच्यावर आखाती अरबांसारखे पैश्यांची ऊधळण करताना आढळतात.

युट्युब,ईंस्टाग्राम व फेसबुक रिळांवर असे शेकडो स्टार्स मंडळी फैमस झालेले दिसुन येतात. त्यातील प्रमुख नाव म्हणजे पुण्याची सुपरहिट डान्सर “पायल सावंत” पायलच्या डान्सचे सोशल मिडीयात लाखोंनी चाहते आहैत. म्हणुनचं प्रत्यक्ष कार्यक्रमाची बिदागी आता खुपचं वाढलेली दिसते. पायल विवाहीत असुन तिला दोन अपत्ये आहेत. असे असले तरीही मुळातचं लावण्याची खाण असलेली पायल आपल्या नृत्यकौशल्याने सर्वांस मोहित करते.
©️स्वप्निल लव्हे

पहा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *