वंदनीय भारतभुषण रतन टाटा सर आणि कर्तुत्ववान महिलांचा योग्य सन्मान व आजच्या घडीला निर्माण केलेल्या संधी!

“प्रगतीची आणि नवनव्या संधींची दालने खुली होत असताना आज हरेक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने प्रगती करताना दिसतात. मग भले ते खेळाचे मैदान असोत की अंतराळाचा भलामोठा पसारा ऊलगडण्याचे आणि आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न कवेत घेणे असो. एकदा का ठरवले तर ह्या नवदुर्गा कुठेही कमी पडत नाही हे खरे! नव्या संधींसाठी आवश्यक असणारी सर्व ती कलाकौशल्ये आत्मसात करत नैसर्गिक बंधनांशीही दोन हात करत अश्या कर्तबगार महिला आपल्या हिंदुस्थानच्या भुमीत कैक हेत.

आज जागतिक स्तरावर नावाजलेल्या आस्थापनांमध्ये काम करताना आपले,आपल्या कुटुंबांचे,गावाचे,राज्याचे आणि देशाचे नाव त्यांनी सातासमुद्रापार मोठे केलेत. ह्यात आयसीआयसीआय सारख्या मातब्बर बँकेत अध्यपदाची धुरा सांभाळणार्या माननीय चंदा कोचर मॅडम, बायोकाॅईनच्या किरण मुझुमदार-शाॅ, खेळप्राविण्याने जागतिक मैदान गाजविणार्या मेरी कोम, महिला संघाला पुरुष संघा बरोबरीने अथवा आजच्या घडीला काकणभर जास्तीचं यश मिळवुन देणार्या श्रुती मंधाना आणि हरमनप्रीत कौर नेतृत्वातील संपुर्ण संघ,

टाफे ट्रॅक्टर्सच्या सर्वैसर्वा मल्लिका श्रीनिवासन आणि मनोरंजन क्षेत्रात दुरदर्शन गाजवणार्या एकता कपुर…आणि आता न संपणारी ही यादी दिवसेंदिवस वाढतचं आहे.” असे असले तरी प्रत्येक क्षेत्रात आव्हाने आणी सर्व भल्याबुर्या संकटांचा सामना काहीकेल्या चुकत नाही हेही तितकेचं खरे होय! काही क्षेत्र तर पुरुषांची मक्तेदारीचं बनल्याची जाणवते किंबहुना आहेचं पण ते आज कबुल करणे आणि पुरुषी अहंकाराला रुचणे अवघड!

अश्यात नव्वदीच्या दशकात जागतिक अर्थव्यवस्था खुली केल्यानंतर ऊत्पादन क्षेत्रात जागतिक कंपन्यांचे भारतात झालेले आगमन व आज ३-४ दशकांनंतर खोलवर रुजत घट्ट होत चाललेले पाळेमुळे देशाची अर्थव्यवस्था आणि भारतीय बाजारपेठेला जागतिक स्तरावर आलेले महत्व अधोरेखीत करतात. स्वातंत्र्यानंतर गेल्या ७५+ वर्षांत आपला देश सुईपासुन अवकाशात झेपावणार्या यानापर्यंत स्वयंसिध्द झालाय हे अभिमानास्पदचं आहे. पण, नाण्याची दुसरी बाजु म्हणजे वाढलेल्या यांत्रिकीकरणामुळे (ऑटोमेशन) बेरोजगारीही बेसुमार वाढत चाललेली आहे. शिक्षणाच्या प्रमाणात संधी न मिळाल्याने कैक तरुण व तरुणी शिकुन ईतर क्षेत्रात नाईलाजाने आपले नशीब अजमवताना बघायला मिळतात.

काही प्रमाणात बोलघेवड्या सरकारी धोरणाने भजी तळायचे फुकाचे सल्लेही ही पीढी कोणत्या दिशेने जाणार हे सैरभैरतेचे द्योतक ठरु लागल्याचा भास होतो. अश्यातचं आशेचा सुर्यकिरण नव्हे तर सुर्य ऊगवल्याप्रमाणे भारतीय ऊद्योगपतींचे महिंद्रा & महिंद्रा,मारुती ऊद्योग आणि देशाचा अभिमान टाटा समुह व ईतर ह्यांचे ऊत्पादन क्षेत्रातील प्रथम पाऊल ते भारतीय आणि जागतिक वाहन क्षेत्रातील अग्रक्रमाचे योगदान दिवसेंदिवस भरघोस वाढीस लागलेले आहे. प्रदुषण व जागतिक तापमानवाढीमुळे त्याचे जाणवु लागलेले ढगफुटीसारख्या पाऊसाचे प्रमाण,पुर,भुकंपे आणि सर्व प्रकारची वादळे सारखा भयानक परीणाम व

आधुनिक पाश्चात्य देशांच्या पुढाकाराने आणि अंशतः दबावानेही आज ईलैक्र्टीक वाहने घेण्यावर जनमानसाचा कौल दिसुन येतोय. ह्या व पुढील दशकात ह्याचा सर्वदुर दृश्य परीणाम सर्व जगतात प्रकर्षाने जाणवेन. ऐक किस्सा आपण ऐकला,वाचला असेनचं कि एकदा वर्तमानपत्रात ईंजिनीअर ह्या पदासाठी जाहिरात देण्यात येते. परंतु,जाहिरातीत फक्त “पुरुष” ऊमेदारांनीचं अर्ज करावेत असे ठळकरित्या छापुन येते. हि सणक डोक्यात जाऊन त्यावेळचे टाटासमुहाचे अध्यक्ष मा.श्री.रतन टाटा सर ह्यांना एका महिलेकडुन एक पत्र पाठविले जाते.

काहीही ऊत्तराची अपेक्षा नसताना आपल्या व्यस्त कामकाजातुन त्या पत्राला ऊत्तर देत मुलाखातीसाठी बोलावणे धाडुन गुणवत्तैच्या जोरावर त्या महिला इंजिनीअरची निवड केली जाते व पुढे काही वर्ष सेवा करताना आपल्या नवर्याच्या नावाजलेल्या जागतिक कंपनीत न जाता अभिमानाने ती स्त्री टाटा मोटर्समध्ये काम करते. आणि नाईलाजाने तीला शेवटी ही नोकरी सोडावी लागते. पण ती आपल्यापासुन व नंतर कैक महिलांना पुरुष मक्तेदारी असलेल्या वाहन ऊत्पादनासारख्या अवघड व श्रमाच्या कामात संधी व समान स्थान मिळवुन देते. ती महिला म्हणजे आपल्या ईन्फोसीसच्या श्रीमती.सुधा मुर्ती होय!” अधिक न सांगता आज आपण ह्याच आशयावरील व अभिमानाने भारलेल्या आजच्या संबंध भारतातील महिला ईंजिनीअर्सना समान संधी देणार्या टाटा समूहाच्या ह्या सेवेबद्दल जाणून घेऊयात….
©️स्वप्निल लव्हे

पहा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *