NMJOKE

भर दुपारच्या उन्हात बैला समोर नाचवल्या बाया बैल पोळा स्पेशल डान्स

“गावकुसातील हरेक ऊत्सव आता जोमात साजरा होत असताना त्यातील पारंपारीक प्रथाही कात टाकताना दिसतात. गावात कुणाचे लग्न असो की बर्थडेसह वयाची साठी आणि अमृत-सुवर्ण महोत्सव सगळा गाव एक होऊन धुमधडाक्यात साजरा करताहैत. भारताची जगात वाढलेली पत आणि शहरांपासुन गावखेड्यांवरही खिशात खेळु लागलेला पैसा त्याला मुख्य कारण ठरते!”

आपले अंगभुत कौशल्य आणि राजकिय आसरा अथवा शेतीतील समाधानकारक प्रगती आणि ईतर जोडधंद्यातील कमाईने गावकुसातील पुढारीही हवा करताहेत. मग बर्थडै,गणेशोत्सव,दहीहंडी व गावजत्रेत लाखौंची बक्षिसे ऊधळुन आपली फुशारकी आणि रुबाब दाखवुन देतात. ऑर्कैस्र्टा,लावणीचे कार्यक्रम व नर्तिका ग्रुप आणुन तमाम गावकर्यांस आकर्षित केले जाते आणि मतदानात हे सर्व मतांच्या स्वरुपात वसुलही केले जातेचं!

वर्षभर शेतात राबराबुन थकलेला बळिराजाचा जीव म्हणजे बैल. ह्या बैलाची शेतकरीराजा पोळ्यास त्यास चांगले धुवुनमाखुन शिंगे साफ करत रंगकाम करत सजविले जाते. नंतर कारभारणीच्या हाताने त्यास ओवाळुन पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. व मग गावात सर्व बैलांची ग्रामदेवतेचे दर्शन करण्यासाठी एकचं रिघ लागते.

विविध रंग,नक्षिकाम,झुल व सजावटीने ह्या दिवशी “सर्जा-राजाची” जोडी अभिमानाने गावात मिरवते. आता ह्या मिरवणुकीतही डिजेडाॅल्बी तर आलाचं आहे पण सोबतीला बाया नाचवणेहि सुरु झालेय. हो हे खरे आहे!!! विश्वास बसत नाहियं का? भरदुपारी गावकुसातुन काढलेल्या बैलपोळ्याच्या मिरवणुकीत बाया नाचवतानाचां हा तुफान व्हायरल झालेला व्हिडीऔ.
©️स्वप्निल लव्हे

पहा व्हिडीओ:

Exit mobile version