पोटासाठी नाचते मी परवा कुणाची गाण्यावर गुलाबी साडी घालून डान्स”

“कला कुठलीही असो पोट भरल्याशिवाय ती सादर करता येत नाही व तिच्या साहाय्याने पोट भरलेचं गेलं पाहिजे अन्यथा कलेचा ध्यास अर्धवट सोडण्याची वेळ आलीचं म्हणून समजा.” हिच कला जेव्हा कलाकारास आपल्यापेक्षा मोठा बनवते तेव्हा कलेचे सार्थक होते. कलाकार हा नेहमी कलेचा ध्यायसक्त असतो. प्रसिध्द लावणीसम्राज्ञी व नर्तिका श्रीमती सुरेखा पुणेकर ह्यांच्या अजरामर “पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाचीऽऽऽ!”

ह्या लावणीने आपली व्यथा तमाम रसिक मायबापांसमोर अवघी मांडली. सादरीकरणातले ते आर्जव रसिकांच्या ह्र्दयापर्यंत पोहोचलै आणि हा हा म्हणता संपुर्ण कलाविश्वात त्या फेमस झाल्या. त्यांच्याचं पाठी आलेल्या ईतर फडमालक आणि ऑर्केस्टास्टार तरी मग कश्या मागे राहतीन म्हणा? ही यादी तशी भरपुर लांबलचक बनत चाललीय. सध्या सणऊत्सव व कार्यक्रमास आलेले ग्लॅमरस स्वरुप अश्या कलाकारांसाठी एक व्यासपीठचं बनलेयं.

काही पारंपारीक आणि ठसकेबाज श्रुंगारिक पण बाज राखत सादर केलेल्या लावणी आणी गाणी प्रेक्षकांची खरोखरीची वाहवा तर मिळवतातचं पण चिरकाल स्मरणातही राहतात. अश्याचं ह्या कलाकार मंडळींत सध्याचे सुप्रसिध्द नावाजलेले मंडळी म्हणजे “पायल विशाल सावंत आणि जागरण गोंधळ पार्टी” ह्यांचे वैशिष्ट्य म्हणजे पारंपारिक गोंधळासोबतचं ग्लॅमरस असे फॅण्टसीपणा आणि बँजोच्या तालावर ठेका धरत नाचणार्या नृत्यांगणा….वाघेमुरळी!

जागरणगोंधळासोबतचं ईतरही कलेचे कार्यक्रम सादर करतानाचे पायलचे घायाळ करणारे व्हिडीओ आज सर्वचं सोशल मिडीया माध्यमांवर जसे की फेसबुक,ईन्स्टाग्राम,युट्युबवर प्रचंड लोकप्रिय ठरलेत. तिच्या एकेका व्हिडीऔला करोडोंत लाईक्स आणी व्ह्युजं मिळालेत. पायलचे वैशिष्ट्य म्हणजे पतीसह दोन अपत्यांची कौटुंबिक जबाबदारी सांभाळत आपली कला सादर करत तिने आपले नाव सर्वश्रुत केलेय. तर मग मंडळी चला तर पाहुयात पायलचा असाचं एक तुफान लोकप्रिय व्हिडीऔ:
©️स्वप्निल लव्हे

पहा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *