भारतीय अभिनेत्री आता ह्या पाकीस्तानीशी करणार लग्न?”

“कहो ना प्यार है! या पर्दापणातील पहिल्याचं चित्रपटातुन ह्रतिक रोशनसह संपुर्ण जगात ओळख मिळवलेली हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजे अमीषा पटेल. पुढे तिचा आलेला गदर सिनेजगतात सर्वश्रेष्ठ चित्रपट ठरला. नंतर आलेले मोजकेचं चित्रपट यशस्वी झाले ज्यात हमराज,क्या यही प्यार है? सामाविष्ट आहेत. त्यानंतर तिचे भरपुर सिनेमे चालले नाहीत व ती विस्मरणात जाऊ लागली.

यश-अपयश प्रत्येकालाचं पचवता येईन असे नाही, हे खरे! पुढे व्यसनांच्या विळख्यात अडकुन तिनेही आपले करीअर बरबाद करुन घेतलेचं! स्मोकिंग,ड्रिकींग सह ड्रग्जच्या आहारी गेलेल्या अमीषाला रिहाब सेंटरही गाठावे लागल्याच्या बातम्या माध्यमांत गाजु लागल्या होत्या! अमीषाची प्रेमप्रकरणेही खुप गाजली. भाऊ अमित पटेलचेही बिगबाॅसमधील प्रेमप्रकरणाने पेपरचे मथळे भरु लागले व त्या प्रेमीयुगुलांस प्रेक्षकही दुरदर्शवर दिवसरात्र बघत नैनसुख घेत राहिले.

नुकत्याचं आलेल्या बातम्यांनुसार अमीषा पाकीस्तानी कलाकार ईम्रान अब्बास सोबत लग्न करण्याचा विचार करते आहे. मूळचा पाकीस्तानी असलेला ईम्रान अब्बास हा ई.स. १९८२ सालचा आणि अमीषा पटेल ई.स.१९७६ म्हणजेचं ती त्याच्याहुन पाच वर्षांनी मोठीय! ईम्रानचे कुटुंब मुळचे लखनौचे आणि भारत-पाकीस्तान फाळणीत १९४७ला ते लाहोरला स्थाईक झाले. ईम्रान अब्बासला चार बहीणी व दोन भाऊ असेन तो सर्वांत धाकटा आहे. त्याने आपली कलाशाखेतील पदवी लाहोरमधुन घेतल्यावर माॅडेलिंग क्षेत्रात नशीब आजमावले व त्याचे भाग्य ऊजळले.

पुढे दुरदर्शनवर मालिका गाजल्या व त्याने पाकीस्तानी चित्रपटसृष्टीतही आपले नाव झळकाळवले. भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीत त्याचे “क्रिएचर-3D” द्वारे आगमन झाले ज्यामध्ये बिपाशा बासु त्याची सहअभिनेत्री होती व ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन विक्रम भट्टांनी केलेले! नंतर जाँनीसार आणी यह दिल है मुश्किल मध्ये त्याला एक छोटासा रोल मिळाला. अमीषासोबत जुळलेले सुत हे नीव्वळ मैत्री असल्याचे अमीषाचे म्हणणे असले तरी तिला आता प्रेमाची ऊणुव आणि त्याला भारतीय चित्रपटसृष्टीत पाव रोवायला कारण असे दोघांसही पुरक बॅकग्राऊंड म्हणता येईन. पुढे येणारा काळचं हे नाते ठरवेन!
©️स्वप्निल लव्हे

पहा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *