धोनी जगतो अगदी साधी लाईफस्टाईल!

“MSD….महेंद्रसिंह धोनी म्हणजे कपिल देव नंतर भारतीय क्रिकेटविश्वास पडलेले सुवर्ण स्वप्न.” भारतचं नव्हेतर अगदी पाकीस्तानसह संपुर्ण विश्वातील क्रिकेटरसिक ज्यावर आपला जीव ओवाळुन टाकतात तो हा भारतीय क्रिकेट कोहीनुर. बेस्ट फिशिनर धोनीने आपल्या थंड डोक्याने भलेभले सामने लीलया जिंकत आपला संघ कठीण परीस्थितीत सांभाळत जिद्दीने व अंगभुत मेहनतीने घडवला व सर्व आंतरराष्र्टीय स्तरावरील विश्वविजेतेपद आपल्या कॅप्टनसीमध्ये मिळवुन दिले.

पानसिंह ह्या सर्वसामान्य क्रिकेट ग्राऊंडमनच्या पोटी जन्मलेल्या धोनीने बेताच्या परीस्थितित आपले शिक्षण तर पुर्ण केलेचं परंतु जपलेलं क्रिकेटचे वेड काही कमी होऊ दिले नाही. वडीलांच्या ओळखीने लागलल्या रेल्वेतील तिकिट तपासणीस (TC) ची नोकरी सांभाळत तो क्रिकेटचाही सराव करत राहिला. रेल्वेतर्फै रणजी खेळताना आपल्या धडाकेबाज खेळामुळे त्याने क्रिकेट निवड समितीचे लक्ष क्षणार्धात खेचले. व पुढे भारतीय संघात संधी मिळाल्यावर मित्रांत रमणारा हा व्यक्ती पुढे आपल्या कौशल्याने व वृत्तीने जागतिक क्रमवारीत अव्वल तर ठरलाचं.

पण आपल्या देशासही २००७ साली पहिला २०-२०चा चषक आणि तब्बल २९ वर्षांनी देशास दुसरा व आपला पहिला विश्वचषक मिळवुन दिला. नविनचं आलेल्या IPL स्पर्धैत आजपर्यंत वरचष्मा असलेल्या “चेन्नई सुपर किंग्स” संघाचा तो हुकमी एक्का तर आहे पण सगळ्यात जास्तकाळ पदावर असलेला कप्तानही आहे. त्याच्या शिरपेचात भारतीय सेनेने दिलेला मेजरचा खिताब आणि असंख्य बक्षिसांचाही तो मानकरी ठरलाय. पण एवढे सगळे मानमरातब मिळुनही त्याच्या डोक्यात ईतरांप्रमाणे यशाची हवा काही घुसली नाही आणि त्याचे पाय आजतागायत जमिनीवरचं राहिले.

आलीशान बाईक्सचा चाहता आणि जवळपास हजार करोडची मालकी संपत्ती असलेला धोनी प्रत्यक्षात आजही अगदी साधी राहणीचं पसंत करतो. जवळपास २.५करोडची आलीशान पोर्चै कंपनीची गाडी असुनही त्याला आपल्या आवडत्या बुलेटवर आणि सायकलवर रांचीच्या गल्लित व रस्त्यांवर राईड मारणे विशेष आवडते. तो अजुनही जमिनीवर बसुन जेवणे व मित्रमंडळिंत रमत गप्पाटप्पा मारतो.

तसेच अगदी साध्या न्हाव्याच्या दुकानात केस कापणे त्याला आवडते. अश्या ह्या महान फलंदाजाच्या आयुष्यावरील “MSD-Untold Story” हा सिनेमा म्हणुनचं लोकप्रिय ठरला व तिकिटबारीवरही कमाइ मिळवुन देता झाला. कधीही कुठल्याचं वादात न अडकणारा व ऊथळ प्रतिक्रिया न देणार्या ह्या महान क्रिकेटरने जरी आज सर्व स्तरावरील क्रिकेटमधुन निवृत्ती घेतली असली तरीही IPL सारख्या स्पर्धैतुन वर्षातुन एकदा दर्शन होतेचं.
©️स्वप्निल लव्हे

 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *