NMJOKE

ऊप्लाई यात्रेत विशेष बायकांचा डान्स!”

“जत्रैयात्रैत पै-पाहुण्यांसह गोडतिखट जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर संबंध गावकुसात फिरुन आबालवृध्दांसह सर्वचजण ह्या ऊत्सवाचा धुमधडाक्यात आनंद लुटतात. कारण, वर्षातुन एकदाचं येणारा हा आनंदमेळावा पुर्ण गाव एकरुप होऊन त्यातील मजा लुटते. खेळणी-पाळणी गोडतिखट भेळभत्ता आणि जलेबी,रेवड्या,गौडीशैव आणि इतर पदार्थांचाही मग भरपुर आद लुटला जातो.”

पुर्वीच्या काळी हलगीतुरा-डफडीवर चालणारी ही गावजत्रा आज बँजोवरुन वळण घेत थेट डिजेडाॅल्बीच्या भिंती ऊभारत कानाचे पडदे फाडणारे गगनभेदी आवाज काढत धुमाकुळ घालत भरते आहे. तरुण पीढीस नेहमीच नवनविन गोष्टींचे चित्ताकर्षण नेहमीचं राहिलेले आहे. त्यास हे कसे अपवाद ठरेन? पहिल्या दिवशी मानाच्या देवीदेवतांचा पुजनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर खर्या अर्थाने यात्रेस सुरवात होते.

जसजशी गर्दी जमु लागते तसा हा कोलाहल आणखीनचं वाढत जातो. रात्रीच्या वेळी तमाशाची जागा ऑर्कैस्र्टाने घेतलेली दिसुन येते. कारण एकतर तमाशाफडांस कौरोनासारख्या महारोगराइने लागलेली पडझड व ऊरलेले नामांकित तमाशाच्या बेसुमार बिदाग्या सर्वचं गावांस परवडीतीन असेही नाहीय. मग अमृताची तहान पाण्यावर भागविण्याचे नानाविध ऊपाय आता अश्या स्वरुपाने समोर आलेत.

त्यातचं मध्यंतरी बंद पडलेले डान्सबार आणि एका मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीची झळ सोसणारे हे कलावंत कुठल्याना कुठल्या मार्गाने आपली कला दाखवत पोटाची खळगी भरताना दिसुन येतात. गाववाड्यावस्त्यांवरील अश्या यात्रा,बर्थडे व ईतर सार्वजनिक ऊत्सवांत कमी बिदागीमुळे ह्यांना बोलावणे धाडु लागलेले आहेत. युपीबिहार व ईतर ऊत्तरेकडील राज्यांप्रमाणे ह्या प्रकारांतही नाच करताना बीभत्सपणा व त्याचे समाजमनावर होणारे परीणाम येणार्या काळात घातकस्वरुपात दिसल्याशिवाय रहाणार नाही हे वास्तव नाकारुन चालणार नाहीचं!
©️स्वप्निल लव्हे

पहा व्हिडीओ:

Exit mobile version